सनविवि मंडळ कार्यक्रम वृत्तांत / अभिप्राय अभिप्राय: मुलाखत – शैलजा काटदरे

अभिप्राय: मुलाखत – शैलजा काटदरे

— सौ आरती रानडे —

महिला दिनाच्या निमित्ताने व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलेची मुलाखत घ्यायचे ठरले.  महाराष्ट्र मंडळ बेंगळुरू नॉर्थ तर्फे, सातारच्या शैलजा काटदरे यांची मुलाखत घेतली.

असे म्हणतात की परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते, पण त्याच्या जोडीला कष्ट करण्याची तयारी, इच्छा आणि मदत करणारे हात पाठीशी असतील, तर मसूर सारख्या छोट्या गावात सुरू केलेला व्यवसाय सातासमुद्रापार पण पोहचू शकतो, हे शैलजाताईंनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वांना दाखवून दिले आहे.

तीन पिढ्यांनी चालविलेला हा व्यवसाय भारताबाहेर पण खूप ठिकाणी पोहचला आहे.  मसाले आणि इतर सर्व नेहमी लागणाऱ्या पदार्थांचे उत्पादन करुन ६० वर्ष चालणाऱ्या ह्या व्यवसायाचा  प्रवास शैलजाताईंनी खूपच छान सांगितला. त्यांचा हा प्रवास व्यवसाय क्षेत्रात नवीन सुरुवात करणाऱ्या महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. ऑनलाईन व्यासपीठावर सादर केलेल्या ह्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पण साथ मिळाली. श्रद्धा आणि आदित्य यांची पण खूप मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *