सनविवि मंडळ कार्यक्रम वृत्तांत / अभिप्राय अभिप्राय – “शनिवारवाड्यातील अस्वस्थ हुंकार”

अभिप्राय – “शनिवारवाड्यातील अस्वस्थ हुंकार”

*कल्पना शेटे*

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र मंडळ बेंगुळुरू-नॉर्थच्या कमिटी मिटिंग मध्ये पुढच्या काही दिवसात घेण्याच्या नवीन कार्यक्रमांविषयी चर्चा चालू होती, अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे नाव सुचविले गेले, “शनिवार वाड्यातील अस्वस्थ हुंकार” नावावरूनच जाणवत होते हा एक वेगळाच विषय आहे. सर्वांनी लगेचच कार्यक्रम करण्यासाठी दुजोरा दिला. पूर्वीच्या काळी स्वामी, राऊ, स्वामिनी अशा दूरदर्शन मालिकांमुळे किंवा अगदी आलिकडच्या बाजीराव मस्तानी सिनेमामुळे सर्वसामान्य लोकांना काही मोजक्याच पेशवेकालीन स्त्रियांबद्दल माहिती आहे, पण या कार्यक्रमामुळे पेशवेकालीन आणखी काही स्त्रियांबद्दल माहिती मिळाली. अभिवाचनाच्या सादरकरत्या होत्या – गंधाली सेवक, अस्मिता ओक, नेहा भदे आणि रुपाली गोखले. दिनांक 6 मार्च 2022 रोजी हा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ बेंगुळूरूच्या फेसबुक पेजवर ऑनलाइन सादर केला गेला. यामध्ये पेशवेकालीन स्त्रियांच्या कर्तृत्वाचे, त्यागाचे आणि अपरिमित भोगांचे काही पैलू अभिवाचनाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पेशवेकालीन इतिहासाचा खूपच बारकाईने अभ्यास करून हा कार्यक्रम तयार केला होता, त्यामुळे खूप सुंदर आणि छान माहिती मिळाली. कार्यक्रम पाहताना सादर कर्त्यांचे परिश्रम, संशोधन आणि अभ्यास पदोपदी जाणवत होता त्यामुळे एक वेगळा आणि सुंदर कार्यक्रम पाहिल्याचा आनंद प्रेक्षकांना मिळाला आणि सादर कर्त्यांची ओळख आणि आभार मानण्याची संधी मिळाली, याचे मला समाधान वाटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *