—रसिका राजीव हिंगे
काय द्यावा अभिप्राय
सामर्थ्य ऐसे लेखणीचे
किती वाचू आनंदे
आभार सनविविचे
किती किती वाचवे अन् आत्मानंदी लीन व्हावे, असं होतं दर महिन्याला सगळ्यांचे लेख वाचतांना.
भाषासौंदर्य, परकीय भाषेची घुसखोरी, भाषेची शुचिता की संवाद यावर व्यक्त होतांना प्रत्येकाचेच भाषेवरील प्रभुत्व जाणवले. लिहिण्याची भाषा आणि तिचे सौंदर्य अबाधित राखत अप्रतिम साहित्य निर्मिती झालेली आहे.
सगळे कसलेले साहित्यिक असे मी म्हणत नाही पण प्रतिभेचे पुजारी मात्र सगळेच आहेत. सुंदर कल्पनाशक्ती आणि आपले विचार सहज पणे मांडण्याची शैली अंगवळणी पडली आहे असे जाणवते.
दर महिन्याला वाचनीय आणि ज्ञानात भर घालणारे लेख वाचून सवय झाली आहे आता. सनविविची अन् पुढच्या अंकाची उत्सुकता वाढते.
सनविविचे खूप खूप आभार आणि अभिनंदन.