–रसिका राजीव हिंगे–
स.न.वि. वि. हा साहित्यपूर्ण अंक हातात आला म्हणजे मोबाईल वर आला त्यावेळी मी प्रवासात होते. तीन दिवस अंक पाहू शकले नाही. क्षमस्व!
वेगळा थाट, वेगळा बाज असलेले, कसलेले सगळे लेखक एकत्र आले आहेत असे वाटावे, इतका सुंदर अंक आहे. माझ्या सारख्या नवोदित लेखकास तर ही साहित्य मेजवानी पाहून खूपच आनंद झाला. विविध विषय, लिहिण्याची वेगवेगळी हातोटी, अभ्यासपूर्ण लेख, असं वाटतंय ही स्पर्धा नाही तर साहित्य जत्रा आहे.
प्रत्येकाचे मन वेगवेगळे विचार करत धावत असतं आणि ते विचार लेखणीच्या टोकावरून कागदावर उमटले की असं गोंडस रुपडं स.न.वि.वि. च्या रूपाने समोर येतं अन पुन्हा लेखणी चालवायला उद्युक्त करतं.
स.न.वि. वि. च्या सगळ्याच लेखकाचे,.संपादकसह पूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. उत्तरोत्तर ह्या अंकाने वटवृक्षासम व्हावा अन साहित्यमेवा लाभावा या सदिच्छा सह.
