अभिप्राय: साहित्योन्मेष

— रसिका राजीव हिंगे —

सनविवी च्या स्पर्धेसाठी

      नटून आली प्रत्येक कथा

      शब्दब्रह्म अवतरले अन

       सालंकृत झाली हो व्यथा

    सनविवि नव्या कल्पनेला  वेगवेगळ्या विचारांचे शब्दसाज लेववत, या महिन्यात अक्षरशः कथा संमेलन किंवा कथा लेखन सोहळा साजरा केला ह्या साहित्यिकांच्या मांदियाळीने. 

    विषय एकच घेतला तरी वेगवेगळ्या संकल्पना एकाच विषयावर किती येऊ शकतात याचे हे मूर्तिमंत उदाहरण. काही कथा वास्तवतेचा स्पर्श असलेल्या असल्या तरी त्या रंगवताना कल्पनेच्या विश्वात घेतलेली भरारी उल्लेखनीय आहे. लालित्यपूर्ण लेखन वाचताना मन भारावून जातं.

    उंच माझा झोका असो  शुक्राची चांदणी चमकत असो, जंगलातली वाट तुडवत असताना सोक्षमोक्ष लावायचा विचार असो की चिंताक्रांत नववधू असो प्रत्येक विषयावरील कथांचे शब्दरूप देखणेच आहे,  कारण ते आपलं स्वतःच लेकरू आहे आणि आपलं बाळ कधी कुरूप असतं का? डावं उजवं असले तरी लाडकेच असतात. अगदी तसंच. 

    कथालेखन हा माझ्यासारख्या नवोदित, हौशी गौषी लेखकाला पचनी पडणे कठीण असले तरी आव्हान स्वीकारायला भाग पाडले ते सनविवि सारख्या प्रतिभेची निसर्ग दत्त देणगी लाभलेल्या साहित्य टीमने. हे खरंच कौतुकास्पद आहे. सनविवी च्या उज्जवल, तेजोमय भविष्याच्या सदिच्छेसह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *