अभिप्राय: साहित्योन्मेष

— अनुराधा भागवत —

एप्रिलचा अंक वाचला. यावेळी अंक लवकर वाचून झाला. सगळ्यांच्या कथा असल्यामुळे उत्सुकता होतीच. मुखपृष्ठ पाहून मन प्रसन्न झाले. या अंकाला मी तर सनविवि… चैत्र २०२२ असंच संबोधते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व पवित्र व मंगल वस्तू मुखपृष्ठावर हजर. सुंदर!आपल्या मंडळाचे कार्यक्रम, उपक्रम अंकामुळे कळतात, तेही छान वाटतं. नवीन माहिती, विषय कळतात. ‘शनिवारवाड्यातील अस्वस्थ हुंकार ‘ कार्यक्रम चांगलाच झाला असेल. अर्थात माझं सगळं लक्ष मुख्यतः आमच्या कथांकडेच होते. कथेचा आशय परिच्छेदानुरुप असावा किंवा कथासूत्र परिच्छेदानुरुप निवडावे अशी अपेक्षा असणार असे मला वाटले होते पण हे फक्त ‘ उंच माझा झोका ‘च्या परिच्छेदाबाबत शंभर टक्के खरं ठरले आहे. बाकी परिच्छेद कथेचा गाभा क्वचितच बनले आहेत ते फक्त कथालेखनांत आले आहेत. हे ही बरोबरच असेल पण स्पर्धा सुरू झाली तेव्हा मला तसं वाटलं नव्हतं इतकंच. कथा पुष्कळशा चांगल्याच उतरल्या आहेत.’ गोष्ट ‘म्हणून मला मानसी तांबेकर यांची ‘ प्रेम कां हक्क ‘ही कथा खूप आवडली. समलैंगिकता पाश्चात्त्य समाजात आजकाल वाढत्या प्रमाणात आढळून येते, आपल्याकडे याचं प्रमाण खूप कमी असावं असं वाटतं पण लेखिकेने चाकोरी सोडून कल्पनेची भरारी मारली आहे. एक चांगली गूढ,रहस्यमय कथा आहे.’ शुक्राची चांदणी….’च्या परिच्छेदावर आधारित सर्वच कथा गूढ, आभासी आहेत, एखादी शृंगार कथा अपेक्षित होती. ‘माय ‘या निवेदिता शिरवटकरांच्या कथेत दिलेल्या परिच्छेदाचा उपयोग अतिशय सटीकपणे व कथेला कलाटणी देण्यासाठी केला गेला आहे. बाकी कथा व प्रयत्न सर्वांचाच चांगला आहे म्हणूनच इतक्या लवकर अंक वाचून संपला.

अशी स्पर्धा घेतल्याबद्दल संपादक मंडळाचे अभिनंदन व आभार.

                                                                                                                                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *