–माणिक नेरकर.
गोड,गोजिरी,छबी दिसे त्या नटखट बालकृष्णाची
फडके भगवा, घरा-घरावरी वर्षे,७५–स्वतंत्रता-पूर्तीची
सजल्या राख्या, हातांवरी खूण, बंधू-भगिनी प्रेमाची
अर्थ नेटका आणि नेमका लागे “ओळख” खरी ती——-
सनविविच्या मुखपृष्ठाची
ऑगस्ट महिन्याच्या अंकाविषयी …
कुठल्याही अंकाची ओळख ही त्या अंकाच्या मुखपृष्ठावरून होत असते, हे सनविवीच्या प्रत्येक महिन्याच्या मुखपृष्ठाकडे बघून सिद्ध होते.
आगामी कार्यक्रम, दारची फुले, वनौषधी—नेहमीप्रमाणेच उत्तम.
“बिघडले ते घडले कसे” ह्या शिर्षका अंतर्गत आलेले लेख वेगवेगळ्या विनोदनिर्मितीची अनुभूती देणारे वाटले. सध्याची परिस्थिती—चिंतन ह्या विषयावर पंकज ह्यांनी जे लिखाण केले आहे, ते खरे तर खूप खोलवर अभ्यास
करून,आकडेवारीसह आहे; पण ते सर्वसामान्यांच्या “डोक्यावरून” जाईल असे वाटले, निदान माझ्यातरी—-
पन्नाशीनंतरचे वेळापत्रक ह्या विषयाला धरून अनुराधा भागवत ह्यांचे लिखाण अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेले वाटले. पुरुदत्त ह्यांचा मित्र आणि काव्य प्रस्तावना हा लेख विनोदनिर्मिती, विडंबनात्मक, कटू वास्तव ह्या सर्व गोष्टींसह परिपूर्ण वाटला.
“सेल्फी, वर्तमानाचं प्रतिबिंब” हा विषय जरा वेगळा वाटला.
“Work from home की home work??” हा कठीण पेपर कुणी सोडवायची हिम्मत केलेली दिसली नाही. असो.
एकंदरीत, सनविवी स्पर्धक लेखक–लेखिकांचे एकीकडे मनोबल वाढवीत आहे आणि दुसरीकडे नवनवीन आव्हाने देखील देत आहे, हे नक्की.
धन्यवाद, टीम सनविवी.🙏
