आगामी कार्यक्रम

महाराष्ट्र मंडळाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून एक विशेष कार्यक्रम १ मार्च रोजी आयोजित केला आहे.

ह्या निमित्ताने घेतलेल्या सनविवि लेख स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी जाहीर  होणार आहे. ह्या स्पर्धेला  भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

त्याचबरोबर, आपल्या हक्काचा कलामंच ह्या उपक्रमांतर्गत १ मार्च रोजी कथा आणि कवितांचे अभिवाचन होणार आहे. आपले मराठी भाषेवर प्रेम आहे. मराठीतील उत्तमोत्तम साहित्य आपण वाचले आहे. आपण वाचलेले

प्रथितयश साहित्यिकांचे किंवा स्वलिखित साहित्याचे सादरीकरण स्वागतार्ह आहे.

कोणताही कथा शैली  चालेल.

(वैयक्तिक ५ मिनिटे आणि सांघिक सादरीकरण १० मिनिटे)

कोणाच्याही धार्मिक, सामाजिक आणि नैतिक मूल्यांना न दुखावता होणारे सादरीकरण अपेक्षित आहे.

अर्थात सादरीकरण नेहमीप्रमाणे दर्जेदार असेल याची आम्हाला खात्री आहे.

अनुक्रमणिका

3 thoughts on “आगामी कार्यक्रम”

  1. सनविविच हे नवीन रूप छान आहे. आवडलं. आता हा छोटासा पण अतिशय माहितीपूर्ण सनविवी इतरही आवडीने वाजतील अशी आशा आहे.
    लेखही छान आहेत. लेखकांचे अभिनंदन.आभार.

  2. सुनियोजित कार्यक्रम. ध्वनी व्यवस्था उत्कृष्ट. सादरीकरणात उल्लेखनीय वैविध्य. दीर्घांक लेखन आणि खासकरून अभिनय दर्जेदार. हक्काचा कलामंच ह्यात सगळ्यांचे कौतुकास्पद सादरीकरण.
    एक उत्कृष्ट कार्यक्रम दिल्याबद्दल मंडळाचे मन:पुर्वक अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *