| योगदान आणि अभिमान पुरस्कार |

महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु आपला संस्थापक दिन गुढीपाडव्याला दिनांक ३० मार्च २०२५ रोजी मंडळाच्या सभागृहात सायंकाळी ५:१५ वाजता साजरा करत आहे. त्या निमित्ताने दुपारी ३:०० वाजता सत्यनारायण पूजेचे आयोजन केले आहे.
सालाबादप्रमाणे संस्थापक दिनाच्या सोहळ्यामध्ये, २०२५ या वर्षाचे “योगदान पुरस्कार” आणि “अभिमान पुरस्कार”, हे मानाचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
आपण जाणतां की मंडळाच्या जडणघडणीत ज्यांनी भरीव योगदान दिले त्यांना महाराष्ट्र मंडळ बेंगळूरूतर्फे “योगदान” पुरस्कारानं सन्मानित केलं जातं आणि बेंगळूरूमधील ज्या मराठी जनांनी विविध क्षेत्रात अभिमानास्पद कार्य केलं आहे त्यांना महाराष्ट्र निवास विश्वस्त मंडळातर्फे “अभिमान” पुरस्काराने सन्मानित केलं जातं.
ह्या वर्षीच्या योगदान पुरस्काराच्या मानकरी सौ. ऋता दीक्षित या आहेत. आपल्यापैकी अनेकांना त्या सुपरिचित आहेत.
ह्या वर्षीच्या अभिमान पुरस्काराचे मानकरी आहेत श्री. जितेंद्र जाधव(डायरेक्टर जनरल, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी).
आपल्या योगदान आणि अभिमान पुरस्कार मानकऱ्यांच्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या सत्कार समारंभात सहभागी होऊन आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण आहे.
