—रेवती कुलकर्णी—
सगळ्यांना ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा !
इंग्रजांची जुलमी राजवट कधीतरी नक्कीच संपेल असा आशावाद बाळगून देशासाठी हसत हसत छातीवर गोळ्या झेलणाऱ्या हसत हसत फाशी जाणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यवीरांना सलाम !!!!
त्यांच्या त्यागातूनच आज आपण हे सुखाचे दिवस बघतो आहोत.
पारतंत्र्याच्या काळ्याकुट्ट अंधारातून नक्की स्वातंत्र्याची पहाट उगवेल ही पक्की आशा बाळगणाऱ्या साऱ्या
स्वातंत्र्यवीरांना समर्पित!
पसरे घोर अंधार पारतंत्र्याचा ,
सरेना तो काल गडद तमाचा,
निर्धार परी साऱ्या क्रांतीवीरांचा
काळरात्र ही नक्की संपवण्याचा !
लावूनी बाजी स्वप्राणांची,
करूनी होळी आयुष्याची,
लढले सुपुत्र मातृभूमीचे,
झुगारण्या ओझे पारतंत्र्याचे!
नाही जाणार व्यर्थ बलिदान,
होईल पहाट स्वातंत्र्याची,
आशा पल्लवे जनांच्या मना,
तुटेल शृंखला पारतंत्र्याची !
अन् जीवघेणी ती रात्र संपली,
स्वातंत्र्यसूर्य उगवला अंबरी,
जाहली हर्षित जनता सारी,
डौलाने फडके तिरंगा गगनावरी!!
