सनविवि मंडळ कार्यक्रम वृत्तांत / अभिप्राय,विनंती विशेष ३१ मार्च २०२२ पर्यंत कार्यक्रमांचा अहवाल

३१ मार्च २०२२ पर्यंत कार्यक्रमांचा अहवाल

–वैशाली तोरवी -सेक्रेटरी महाराष्ट्र मंडळ एप्रिल २०२१ पासून कार्यरत झालेल्या मंडळाच्या नवीन कार्यकारिणीने आपल्या कार्यक्रमांची सुरुवात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून केली . 

मे  २०२१ 

१ मे २१ रोजी मंडळाच्या झूम पीठावर २ कार्यक्रम झाले. त्यात प्रथम महाराष्ट्र मंडळाचा साहित्य विभाग “अभिव्यक्ती” गटाने महाराष्ट्राच्या जडणघडणीतील काही निवडक घटना व व्यक्तिविशेषांविषयी माहिती दिली . यानंतर डॉ .श्रीनंद बापट यांचे व्याख्यान झाले. विषय होता,

“प्राचीन कोरीव लेखातून दिसणारा महाराष्ट्र” त्यांची ओघवती भाषा व द्रुक-श्राव्य माध्यमाचा वापर करून सांगितलेल्या माहितीमुळे हे सगळे मनाला भुरळ घालून गेले.

९ मे आणि १६ मे रोजी सुट्टीतील अभिव्यक्ती मधे लहान गटात स्वाती राजे यांची “शोध” ही  कथा सांगितली व कथेच्या आधारे मुलांना फॅमिली ट्री बनवायला सांगितले तर किशोर गटासाठी हॅरी पॉटर च्या पुस्तकांवर प्रश्नमंजुषा घेतली व “आकाशातील भुते” ही विज्ञान निष्ठ fantancy वरील गोष्ट ऐकवली. मुलांना वन्यजीवनावर उत्कंठावर्धक माहितीही मिळाली. २५ ते ३० बालगोपाळांनी यात सहभाग नोंदवला होता.

६ मे रोजी मंडळाच्या उत्तर विभागाने “महामारीला पुरून उरताना” या विषयावर व्याख्यान ठेवले होते. महामारी आणि टाळेबंदीमुळे ताणतणाव व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, अश्या परिस्थितीत आपले मनःस्वास्थ्य कसे टिकवावे याचे मार्गदर्शन केले, डॉ.  अद्वैत पाध्ये यांनी. ते मनोदय ट्रस्ट डोंबिवली या संस्थेचे अध्यक्ष ,संचालक असून मनोविकारतज्ज्ञही आहेत. 

२० ते २४ मे या कालावधीत ‘फिरती महाराष्ट्राची व महाराष्ट्र मंडळ,बेंगळुरू ‘ यांच्या संयुक्त विद्यमाने गुगलमीट वर “दुर्ग अभ्यास वर्ग” आयोजित केला होता. यात पुढील विषयांवर विवेचन केले गेले. १. महाराष्ट्रातील दुर्ग  २.शिवकालीन दुर्ग व व्यवस्था  ३.स्वराज्याच्या तीन राजधान्या  ४. दुर्गावरील द्वारशिल्पे  ५. दुर्ग समज  व गैरसमज . वक्ते होते इतिहास अभ्यासक महेश तेंडुलकर  

३० मे २०२१ रोजी शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे ह्याचा सर्वंकष विचार व्हावा म्हणून “आयुर्वेद एक जीवन पद्धती” या विषयावर डॉ. अश्विनी गोडबोले यांनी मार्गदर्शन केले व श्रोत्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. हा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळाच्या उत्तर शाखेने आयोजित केला होता.

जून  २०२१६ जून २०२१ , जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मंडळाने वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. त्या मधे सहभागी घेणाऱ्यांना ३ मिनिटाचा व्हिडिओ पाठवायला सांगितला  होता. विषय होते १. पर्यावरणाला माझा हातभार २. पर्यावरण – सामाजिक बांधिलकी. स्पर्धेचे परीक्षण ऊर्जा व पर्यावरणाचे अभ्यासक श्री . शिवानंद जांभळे यांनी केले. या ऑनलाईन कार्यक्रमात बक्षीस  मिळालेले व्हिडिओ दाखवण्यात आले. तसेच मंडळातर्फे एक अनोखी स्पर्धा जाहीर केली . पर्यावरणाचे जतन करणे व समाजात रुजवणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश. स्पर्धा : घरातल्या ओल्या कचऱ्याचे खतात (काळे सोने) रूपांतर करणे व bio -enzime  बनवणे. या स्पर्धेत महाराष्ट्रातूनही सहभाग नोंदवला गेला.  सातत्याने ज्यांनी हे केले त्यांना आपण गणपतीत बक्षिसे दिली.

 १३ जून रोजी महाराष्ट्र  मंडळाच्या   उत्तर शाखेने लहान मुलांसाठी ऑनलाईन  कार्यशाळा घेतली ज्यात १.’ fun with Warli Painting ” – श्रद्धा कुलकर्णी 

२. “Bake your own Healthy Treats “- रुपाली मेहेंदळे. छोट्या दोस्तांनी painting आणि Healthy Treatsचा मनमुराद आनंद लुटला . 

२० जून- जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र  मंडळाच्या उत्तर शाखेने “योग साधना व आरोग्य” ह्या कार्यक्रमात मनाचे व शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी योग साधनेची कशी मदत होते हे योग्य प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन घडविले. मार्गदर्शिका होत्या योगसाधक, समुपदेशक व योगथेरपीस्ट वैद्या सविता कालगांवकर .

जून महिन्याच्या अभिव्यक्तीमधे “कथा” हा विषय होता पहिल्या भागात आवडलेल्या कथांचे सार व त्याबद्दलची आत्मीयता सांगायची होती. दुसऱ्या भागात ५/६ सभासदाचा गट करुन कथा विस्तार करायचा होता प्रत्येक व्यक्तीने कल्पकतेने कथा फुलवली व गुंफली त्यामुळे कल्पक विचार निर्मितीच्या प्रयोगाचा आनंद सगळ्यांना मिळाला.

जुलै २०२१

महाराष्ट्र मंडळाच्या उत्तर विभागाने ” Life Begins @ ५० ” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ह्यात आर्थिक नियोजन कधीपासून व कश्या प्रकारे करावे या संबंधी मुंबई येथील  Happiness Factory चे श्री रुपेश प्रभु व महेश रामस्वामी यांनी त्यांच्या व्याख्यानातून सांगितले. आर्थिक विषयावर हा पहिलाच कार्यक्रम होता .

मंडळाच्या  Social Initiative Group तर्फे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गीयांसाठी मोफत लसीकरण आयोजित करण्यात आले होते. यात १८ ते ७८ वयोगटातील १०० लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला . 

२२ जुलैच्या पावसाने महाराष्ट्रातील चिपळुण, कोल्हापुर, सांगली या भागात अनेकजण पूरग्रस्त झाले. त्यांना धान्य, कपडे, भांडी व इतर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा आपण केला .

ऑगस्ट २०२१

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त कोविड पेशंटची काळजी घेणाऱ्या ‘बोअरिग ‘ व लेडी कर्झन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला त्यावेळी त्यांनी आपले अनुभव कथन केले. अगदी सहजपणे ,प्रामाणिकपणे व मनमोकळेपणाने सांगितलेले हे अनुभव सुन्न करून गेले. 

ऑगस्ट मधील अभिव्यक्तीचा विषय होता ‘नाटकाचे रसग्रहण’. यात हॅन्ड्स अप, आभास, एका घरात होती, संगीत सौभद्र , लहानपण देगा देवा या नाटकांचे रसग्रहण केले गेले . उत्तरार्धात नाटक या विषयावर Quiz घेतले. 

सप्टेंबर २०२१

याही वर्षी कोविडमुळे गणेशोत्सव online करावा लागला . 

गणेशोत्सवातील  कार्यक्रमात :

१. अपर्णा सहस्रबुद्धे यांनी सादर केलेल्या भारुडात नृत्य, नाट्य, अभंग ,वारी यांचे एकत्रित दर्शन घडवले . 

२. व्हॉइस ऑफ  बंगळुरु या मालिकेतील पहिल्या भागात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गीतांची अनोखी मैफिल रंगली. 

३. विविध गुण  दर्शनसाठी चित्रपटाची नावे /title ही थीम दिली होती. ७ संघानी भाग घेतलेली ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली..

४. जोडी तुझी माझी ही नृत्य स्पर्धाही गाजली. 

५. बालगोपालांसाठी जादूचे प्रयोग सादर केले जादूगार धनश्री यांनी तर वेशभूषा स्पर्धेला भरघोस प्रतिसाद देत कृष्ण ,बार्बी ,गोविंदा ,दहीहंडीवाला ,शेतकरी अशी विविध रूपे पाहायला मिळाली. . 

६. गणेशोत्सवाचे  आकर्षण ठरले धनश्री लेले यांचे व्याख्यान -” दासबोधातील जीवनयोग ” . 

७. शेकडो वर्षापूर्वीची रंगभूमी ते वेब सिरीज या विषयावर हृषीकेश जोशी यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पा.

दोन वर्ष साजरा न झालेला शकलेला संस्थापक दिन १९ सप्टेंबर २०२१ रोजी अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर साजरा केला गेला. २०२० चे योगदान पुरस्काराचे मानकरी श्री.अनिल बोकिल व २०२१ चे योगदान पुरस्काराचे मानकरी श्री. राजीव पोतनीस. तसेच २०२० चे अभिमान  पुरस्काराचे मानकरी प्रसिद्ध क्रिकेट पटु श्री राहुल द्रविड यांचा यथोचित सत्कार केला गेला.

ऑक्टोबर २०२१

अभिव्यक्तीच्या सभेत कवितेचे तुलनात्मक रसग्रहण करणे हा उपक्रम घेतला. एक पारंपरिक वा जुनी कविता आणि साधारण तशीच वा मिळत्या जुळत्या विषयावरील नवी कविता यांचे रसग्रहण.

महाराष्ट्र मंडळ आणि स्वकृता चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सयुंक्तपणे मराठी उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले. यात मराठी व होतकरु उद्योजकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे हा उद्देश होता .

रविवार दि ३१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र  मंडळाच्या   उत्तर शाखेच्या  मदतीने ” दिवाळी आकाश कंदील ” बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

नोव्हेंबर २०२१

रविवार दि ७ नोव्हेंबर- दिवाळी निमित्त “सूर संध्या” ह्या व्हॉइस ऑफ बंगळुरुच्या दुसऱ्या भागाचे आयोजन केले गेले. याच दिवशी रांगोळी स्पर्धा व दिवाळी फराळ स्पर्धेचे आयोजन केले होते. दिवाळी किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर केला व उपस्थित प्रेक्षकांना स्पर्धेतील किल्ल्याचे दर्शन घडविले मंडळातर्फे दिवाळी फराळ देण्यात आला. सुमारे २ वर्षानंतर झालेल्या ह्या कार्यक्रमाने प्रेक्षक व आयोजक दोघांचाही आनंद व्दिगुणित झाला. 

डिसेंबर २०२१

” शब्दक्षरी ” – या स्पर्धेचे आयोजन केले होते. ६ संघानी भाग घेतला. शब्द व गाणी यांचा अनोखा संगम, स्वनिर्मित नाविन्यपूर्ण फेऱ्या. या वर्षीची सर्वात आवडती फेरी ठरली स्वयंपाक घरातील क्रियांची क्रियापदे लिहिणे. सहभागी स्पर्धकांना ही स्पर्धा इतकी आवडली कि वर्षातून २ वेळा आयोजित कराल का? अशी विचारणा झाली.

जानेवारी २०२२

२६ जानेवारी- प्रजासत्ताकदिन, मंडळात कार्यक्रमाचे प्रमख पाहुणे होते श्री अरुण घाटगे व सौ घाटगे. १९९१ साली देशासाठी प्राणार्पण करणारे flying officer मदन घाटगे यांचे ते बंधू. बंधूची एरफोर्स मधील सेवा, त्यांचा शाळा ते शेवटच्या श्वासापर्यंतचा प्रवास हे सगळे ऐकताना अंगावर शहारे आले. काय ती हिंमत, निडरता ! आपण फक्त नातमस्तकच होऊ शकतो अश्या क्षणी !

३० जानेवारी, महाराष्ट्र मंडळाच्या उत्तर शाखेने पेन्टींगची कार्यशाळा आयोजली होती. ‘one stroke painting ‘ यात निरुपमा चिरमाडे यांची विशेष ओळख. या कार्यशाळेत ४० जण सहभागी झाले होते.  नंतर – Design Thinking – Thinking Design  या विषयावर सुजय घोरपडकर यांनी आपले विचार मांडले व हा विषय सोपा करून सांगितला . 

जानेवारीच्या अभिव्यक्ती सभेत “चार सख्य चोवीस” या लघुकथा संग्रहाच्या लेखिका, ‘कृष्णा प्रिया ‘या नावाने अध्यात्मिक लेखन करणाऱ्या हर्षदा बोरकर यांनी संवाद साधला. समाजाला अभिव्यक्तीचा कसा उपयोग होऊ शकतो ते बघा, इतरांना संधी द्या असे सांगून वंचितांचा रंगमंच या विषयी भरभरून बोलल्या. 

फेब्रुवारी २०२२

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून,  अभिव्यक्तीमधे मराठीतील अत्यंत गाजलेल्या व अभिजात कलाकृती समजल्या गेलेल्या विश्राम बेडेकर लिखित ‘रणांगण’ या कादंबरीचा रसास्वाद प्रेक्षकांना करून दिला, डॉ. वंदना बोकील -कुलकर्णी यांनी . 

मंडळाच्या ‘रंगदक्षिणी’ या नाट्य स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन केले होते.  ह्या स्पर्धेमध्ये  बंगलोर मधील ३ संघानी भाग घेतला.  प्रथमच डिजिटल माध्यमाचा उपयोग करून नाटिका सादर करणे हे प्रत्येक संघासाठी आव्हान होते पण ते सर्वानी यशस्वीरित्या पेलले व स्पर्धा यशस्वी झाली.

मार्च २०२२

महाराष्ट्र मंडळाच्या  उत्तर विभागाने “शनिवार वाड्यातील अस्वस्थ हुंकार” ह्या गंधाली सेवक लिखित नाटिकेचे अभिवाचन आयोजित केले. मराठी राजवटीसाठी ज्यांनी आपले आयुष्य झोकून दिले अश्या काही स्त्रियांच्या कर्तृत्वाचे ,त्यागाचे व पेशवाईच्या झगमगतआड लपलेल्या भोगाचे काही पैलू  सादर केले. 

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र मंडळ  उत्तर विभागाने प्रसिद्ध “काटदरे” उत्पादनांच्या संचालिका सौ. शैलजा काटदरे यांच्या यशाचा मनोवेधक प्रवास प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकण्याची संधी रसिकांना उपलब्ध करून दिली.

बेंगळुरूमधील वसंतोत्सवात  आबालवृद्धांनी ३ तास नाट्यसंगीत व मी वसंतराव चित्रपटातील गीतांचा मनसोक्त आस्वाद घेतला. मंडळाचे  विशेष उपक्रम 

१. महाराष्ट्र मंडळाच्या सभासद संख्येत वाढ व्हावी म्हणून  मंडळाच्या १०१ व्या वर्षात रु ५०००/- भरून मंडळाचे १०वर्ष सभासदत्व ही योजना सुरु केली. 

ह्या वर्षातील सभासद संख्या – १० वर्ष -२५ ,आजीव -४ ,honorary -०६, ३ वर्ष -१४ , १वर्ष -३७

२. मंडळाचे मुखपत्र स .न .वि .वि हे सध्या e -snvv च्या स्वरूपात आपण पाठवतो, त्यामुळे त्याची पृष्ठ संख्या, फोटो, मजकुर वाढवू शकलो व जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकलो . 

३. स .न .वि .वि च्या ‘साहित्योन्मेष’ ह्या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला असून अनेक नवनवीन लेखक /लेखिका त्यात आपले लेख पाठवतात.

४. स .न .वि .वि मधील  काही निवडक साहित्य आता आपण रेडिओ स .न .वि .वि च्या माध्यमातून ऐकू  शकतो. आत्तापर्यंत एकुण २९ एपिसोड झाले आहेत. 

५. मंडळाचा टेलिग्राम ग्रुप या वर्षी सुरु झाला त्यात १३२३ सभासद आहेत . 

६. मंडळाचा WA , Telegram, Facebbok , twitter , Instagram g-mail, website या सर्व डिजिटल माध्यमातून आपण सर्व कार्यक्रमांविषयी वेळोवेळी माहिती देत असतो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *