–माणिक नेरकर.–
पाना फुलांना नवी झळाळी
ऋतुबदलाची रम्य नव्हाळी
प्रसन्न धरेचे हे रूप पाहता
ब्रम्हानंदी लागे टाळी
निसर्ग अवघा नटलेला
कणाकणाने,क्षणाक्षणाने
अंगोपांगी बहरलेला
सृष्टीचे हे रूप बघूनी
आसमंतही जणू थबकलेला
सौंदर्य हे कुणा स्वर्गीय अप्सरेचे
“सनविवि” ने अचूक “टिपलेले”