सनविवि मंडळ कार्यक्रम वृत्तांत / अभिप्राय “सनविवि”–गणपती विशेषांकाविषयी”–

“सनविवि”–गणपती विशेषांकाविषयी”–

 

माणिक नेरकर.

 

बेंगळूरु सारख्या ठिकाणी मराठी अस्मिता जपत, आपल्या रूढी, परंपरांचे भान ठेवत  महाराष्ट्र मंडळाने जे विविध आणि स्तुत्य उपक्रम राबवले, यशस्वीपणे  आयोजन, नियोजन करून पार पाडले, त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन! हे सगळं अर्थात, अंकातील अभिप्रायांवरून समजले. त्यामुळेच प्रत्यक्ष सोहळा “याची देहा, याची डोळा” बघता आला नाही, ही खंत तीव्रतेने जाणवली.

नाट्य कार्यशाळेचे आयोजन, अध्यात्मिक शिबिराचे आयोजन,  कीर्तन, भजन,  नाटक, पोवाडे, मुलाखती—-असे विविधरंगी कार्यक्रम—त्यात प्रसिद्ध कथाकार माधुरी शानभाग ह्यांनी केलेले बहिणाबाईंच्या कवितांचे रसग्रहण म्हणजे —ते सुख काय वर्णावे?—असेच असणार. महाप्रसादाचे आयोजनही कौतुकास्पद वाटले.  

बाकी लेख आणि कथांबद्दलचा निर्णय परीक्षकांनी दिलेलाच आहे.

पुनश्च एकदा संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि कौतुक.  

धन्यवाद!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *