अभिप्राय – साहित्योन्मेष

— रसिका राजीव हिंगे — 

बारा महिने बारा लेख किती समर्पक शीर्षक. बारा या संख्येला तसेही विशेष महत्त्व आहेच. सनविविचे साहित्योन्मेष या स्पर्धेत सहभागी होण्याचे कारणही हे शीर्षक आहे. सुरवातीला वाटले एखादा लेख टाकून बघू, जमले तर. कारण स्पर्धा म्हटली की इथे दिगग्ज उतरणार हे अध्याहृत आहे.
ह्या स्पर्धेचे रूप, सनविविची व्यापकता पाहून त्यातील प्रतिभेने भारलेले साहित्य वाचून मला लिहायला भाग पाडले. खूप छान नाही लिहिता येत पण लिहावेसे वाटतंय याचं श्रेय साहित्योन्मेषला.
सगळेच लेख एकापेक्षा एक सरस, वाचतांना तर असे वाटते की ही स्पर्धा नाही तर एखाद्या छानशा पडद्यावर सरकणारी चलचित्र आहेत, इतके बोलके भाव लेखात, कथेत आहेत.
ही साहित्यिकांची मांदियाळी पाहून खूप भाग्यवान समजते मी स्वतःला मला यांचे साहित्य वाचायला मिळतंय, सनविविची मी एक भाग झाले आहे.
प्रचंड ताकदीचा भार सनविवि पेलते आहे आणि याला आपली काठी टेकली आहे या परिस आनंद तो कोणता?
उत्तरोत्तर प्रगतीपथावर सनविविची वाटचाल व्हावी या शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *