— सौ. रुचिता बोधनकर दवंडे —
मे महिन्याचा स.न.वि.वि. वाचला. नेहमीप्रमाणे सर्वच लेख आणि सदरे वाचनीय होती. पण एक स्पर्धक म्हणून मला उत्सुकता होती ती “साहित्योन्मेष” ह्या स्पर्धेतील लेखांची. मे महिन्यात दिले गेलेले विषय हे उन्हाळा आणि सुट्टी ह्यांच्याशी संबंधित होते. प्रत्येक विषय हा किती वेगवेगळ्या विचारांनी मांडता येऊ शकतो हे सर्व लेख वाचून लक्षात आले. साहित्योन्मेष स्पर्धेमुळे विविध विषयांवर आणि विविध साहित्यप्रकार लिहायला मिळत आहेत. त्यामुळे माझ्या लेखनाला निश्चितच एक चांगली दिशा मिळते आहे. जसजशी स्पर्धा पुढे जाते आहे तसतशी चुरसही वाढते आहे. माझ्या सर्व सहस्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा आणि इतकी छान स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद.
