–माणिक नेरकर–
मुखपृष्ठ तर as usual उत्तमच. “दारची फुले” ह्या शिर्षकाखालील रेवती मॅडमच्या पावसावरील दोन्ही कविता वाचनीय. वनौषधी ह्या सदरात कायम उपयुक्त आणि मार्गदर्शक अशीच माहिती मिळत असते. सनविवि तर्फे घेण्यात आलेले आणि घेतले जाणारे(आगामी) कार्यक्रम देखील उल्लेखनीय वाटतात. विविध विषय एकाच वेळी हाताळणे ,तेही यशस्वीपणे, सनविवि ला छान जमले आहे,त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. आता लेखांविषयी थोडक्यात—
कविता मोजक्याच आहेत, त्यात विशेषतः पंकज आणि पुरुदत्त ह्यांच्या कविता अप्रतिम झाल्या आहेत. पत्र लेखनात मानसी आणि देवश्री मॅडम च्या लेखनाचा गाभा वेगळा आणि हटके जाणवला आणि आवडला देखील. अभ्यासपूर्ण,विविध उपमा देऊन अलंकृत केलेले लिखाण मनाला भावले. अनुराधा मॅडमनी पत्राचा मसुदा अगदी तारीख, गावाच्या नावासह छान तयार केलाय. स्वानुभवाने आलेले लिखाण आवडले. सुळे मॅडमच्या आतापर्यंतच्या लेखांच्या तुलनेत ह्या वेळच्या लिखाणाने जरा निराशा वाटली. पत्रलेखन कमी आणि अंदमानच्या पावसाळ्याची माहिती जास्त वाटली. किरकोळ अपवाद वगळता एकंदरीत सर्वांचेच लेखन चांगले झाले आहे.
माझ्या अपेक्षेप्रमाणे झाडे, वेली(वृक्ष वल्ली) ह्यावर कुणीही लिहिले नाही ह्याचे जरा नवल वाटले.