–निवेदिता शिरवटकर–
सर्वप्रथम साहित्योन्मेषच्या सर्व लेखकांचे मनापासून अभिनंदन !
‘ नूतन वर्षाभिनंदन ‘, ‘ हॅपी न्यू इयर ‘, ‘ संकल्प ‘ ह्या लेखांमधूनही आपल्या सर्वांचे सुरेख शब्दात अभिनंदन केले आहे. त्यामुळे नवनवीन संकल्प करायला स्फूर्ती मिळाली आहे.
‘ खिडकी ‘ लेख वाचताना आपसूकच मनाची सर्व कवाडे खुली होत आहेत असे वाटले.
‘ शाळा सुटल्यावर ‘ व ‘ डिकी मधल्या आठवणी ‘ह्या लेखांतून लेखिकांनी कैक वर्षे मागे त्या शाळेच्या, बालपणीच्या जगात नेले.
‘ करि डळमळ…. ‘ ह्या लेखातून ज्या दूर देशीच्या भूकंपाविषयी इतके दिवस दुरून ऐकले होते त्याचे इतके जवळून वर्णन वाचण्याची संधी लाभली.
‘ ऑनलाईन शाळेचा …. ‘ ह्या लेखातील मजेशीर आणि
‘कावळ्याच्या शापाने ‘ यातील अनोखे अनुभव ह्या सर्वांनी चांगलेच मनोरंजन केले.
‘ अंतरीची खूण ‘ ,’ तडजोड’ , ‘ पालकत्वाचे स्वप्न ‘ ,
‘ स्पर्श नात्यांचा ‘ , ‘ माझे एकत्र कुटुंब ‘ ह्या लेखांनी वैयक्तिक आयुष्यातील हळुवार भावना आणि अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
‘ माणूस आणि विश्वास ‘, ‘ माणुसकी ‘ , ‘ मन अचपळ माझे ‘, ‘ मनाची श्रीमंती ‘ ह्या लेखांनी मानवी अंतरंगाला छान साद घातली.
‘ कुतूहल पुस्तकांच्या गावाचे ‘, ‘बदामी गुंफा मंदिरे ‘ आणि
‘दिंडी चालली हर्ण्येला ‘ वाचताना त्या ठिकाणी मन नकळत जाऊन पोहोचले.
एकूणच काय असा हा बहुरंगी अंक वाचताना खूप मजा आली. ह्या अंकाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांकडून खूप काही शिकण्याची संधी मिळेल ही आशा.
त्याबद्दल सर्व लेखकांचे आभार ! निवेदिता तर्फे!