अभिप्राय- सनविवि

–सौ. अंजना घैसास–

नमस्कार ,

आपल्या मंडळाचा ह्या महिन्याचा अंक अत्यंत आवडला. नव उपक्रमांनी तर मनीच्या चेतनाही जागविल्या. त्याच अनुषंगाने चार चरण लिहायची मनीषा उत्पन्न झाली… आणि क्षणार्धात ह्या ओळी नकळत, अंकाच्या प्रभावाने लिहिल्या गेल्या… 

नवनवतेची शिखरं 

पादाक्रांत करतो आहे,

मंडळाचा e सनविवि. 

जणू, नाविन्याची घेऊनी आभा 

आला नववर्षाचा रवि

नव वर्षातील नव अंकाची

होती मजला ओढ अंतरी 

पाहूनी वाचता, वाचता 

कशी गुंगुंनी गुंतले सारी. 

उत्कृष्ट साहित्याची 

पखरण पानोपानी. 

साहित्याचा हा सडा

परिमल पसरवितो मनी. 

मनाच्या खिडकीत हा 

 कवडसा अलवार शिरला 

 बावीस लेखांचा महिमा, 

 मनांस भिडला. 

साध्या, सरळ, सोप्या 

शब्दांच्या मेखला

होऊनी, कधी अतिरंजीत, 

साहित्योन्मेष हा सजला. 

 विविध विषय, विचार

  जणू, नाना पक्वांनाचे एकच ताट. 

  वाचकांना तृप्त कराया 

  अनोखा घातला एकच घाट. 

ह्या घाटांतील, हा नंदादीप

अधिकची तेजाळूनी प्रकाशू दे

नव नवतेचे आविष्कार हे

लेखणीतून उजळू दे 

ह्या अभिव्यक्तिंना, साहित्यिकांना

 मन:पूर्वक अभिनंदन

 अशा स्तुत्य उपक्रमांना 

 वाचक करतील वंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *