क्रमश:

कहाणी हिरोशिमाची भाग सहा

हिरोशिमा आणि नागासाकीतल्या अणुस्फोटांना नुकतीच सत्तर वर्षे पूर्ण झाली. या सात दशकांमध्ये परिमाणे खूपच बदलली. महायुद्धे नसली तरी जगाने बरीच लहान मोठी युद्धे पाहिली.

सत्तर वर्षांपूर्वी अणुबॉम्ब म्हणजे अणुच्या फिजन या साखळी प्रक्रियेतून निर्माण झालेली ऊर्जा वापरून स्फोट घडवणारे बॉम्बस होते. त्या काळाचा विचार करता हे अत्याधुनिक, अत्यंत जड असे नवीन अस्त्र होते. परंतु 70 वर्षात विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे आणि ती शस्त्रास्त्रांमध्ये सुद्धा दिसते. आज अणुबॉम्ब ही एक व्यापक संकल्पना आहे त्यात अणुच्या फिजन आणि फ्युजन या दोन्हीही साखळी प्रक्रियांद्वारे निर्माण झालेले बॉम्स, हायड्रोजन बॉम्ब, कोबाल्ट बॉम्ब या सर्वांचा समावेश होतो.

अधिकृतरित्या आज जगात जवळजवळ 12500 अन्वस्त्रे आहेत. अमेरिका, रशिया, युनायटेड किंगडम, फ्रान्स, चायना, भारत, पाकिस्तान, नोर्थ कोरिया आणि इजराइल या नऊ देशांत विभागली गेली असली तरी यातील जवळपास दहा हजार म्हणजे 88% अण्वस्त्रे रशिया आणि अमेरिका या दोन देशांकडे आहेत.

यातही न्यूक्लियर फिजन या प्रक्रियेद्वारे स्फोट होणाऱ्या बॉम्ब पेक्षा न्यूक्लियर फ्युजन या प्रक्रियेने स्फोट होणारा बॉम्ब, ज्यात हायड्रोजन बॉम्बचा ही समावेश होतो हे अति घातक अस्त्र अमेरिका, रशिया, युनायटेड किंगडम, चायना, फ्रान्स आणि भारत या सहा देशांकडे आहे. हायड्रोजन बॉम्ब हे अणुबॉम्बचे सध्यातरी माहित असलेले सर्वात आधुनिक आणि सर्वात घातक असे स्वरूप आहे. हिरोशिमाच्या लिटिल बॉय शी तुला ना केली तर आजचा हायड्रोजन बॉम्ब हा जवळजवळ एक हजार पट अधिक घातक आहे असे म्हणता येईल. त्याची विध्वंसक त्रिज्या ज्याला शास्त्रीय भाषेत डिस्ट्रक्टिव्ह रेडियस ऑफ द बॉम्ब असे म्हणतात सुद्धा जवळजवळ सहा ते दहा पट आहे.

हिरोशिमा आणि नागासाकीत झालेली जीवित आणि वित्तहानी तर मोजण्याच्या परिमाणात होती पण या बॉम्बजनी मोजता येणार नाहीत असे इतरही अनेक सामाजिक, मानसिक परिणाम घडवून आणले. स्फोटातून वाचलेल्या अनेकांना कॅन्सरसारख्या आजारांचा सामना करावा लागला हे तर सर्वश्रुत आहेच पण नंतरच्या एक किंवा दोन पिढ्यांमध्येही अपंग मुले जन्माला येणे, स्फोटाच्या वेळी न जन्मलेल्या बाळांना सुद्धा दुर्धर आजार होणे असे अनेक परिणाम दिसून आले.  अणुस्फोटानंतरची जवळजवळ दोन दशके हिरोशिमा आणि नागासाकीतल्या तरुण-तरुणींशी विवाह करायला जपानच्या इतर भागातली लोकं तयार होत नव्हती तिथल्या किंवा आजूबाजूच्या भागात पिकलेली धान्य, तिथल्या कोंबड्यांची अंडी, प्राण्यांचे मास हे सारे विकत घ्यायला दजावत नव्हती यात त्यांचा दोष आहे असं म्हणता येणार नाही कारण रेडिएशनचे काय काय परिणाम होऊ शकतात हे नीटसे माहित नव्हते. पण आधी अणुबॉम्बचा हल्ला, त्यात गमावलेली असंख्य जवळची माणसे आणि त्यानंतरचे हे सामाजिक परिणाम याला त्या पिढीने कसे तोंड दिले असेल याचा विचारही करवत नाही. आजकालच्या काळात फक्त जीवित आणि वित्तहानी नाही तर असे सामाजिक परिणामही किती पट होऊ शकतील याची आपण कल्पना करू शकतो.

याच दुसऱ्या महायुद्धाने आणखीही एक कायमस्वरूपी  परिणाम घडवला यानंतर रणांगणाच्या सीमा बदलल्या किंबहुना संपल्या.  युद्धाच्या काळात मानवी वस्त्या शाळा हॉस्पिटल्स यांना धोका गेले कित्येक दशके आहेच पण आता मिसाइल्स ड्रोन्स या सर्वांमुळे तळघरे बंकर्स सुद्धा सुरक्षित राहिलेले नाहीत.

हिरोशिमा आणि नागासाकीत झालेले अणुबॉम्बचे स्फोट ही मानव जातीच्या इतिहासातील एक अत्यंत भयानक घटना नक्कीच आहे. पण फक्त इतिहास सांगणे हा या लेखमालेचा हेतू नाही.  युद्धाच्या रम्यकथा जगापर्यंत पोहोचवणे हा तर मुळीच नाही.

हिरोशिमा आणि नागासाकीत मरण पावलेले सारे जण होते सर्वसामान्य नागरिक! अणुबॉम्बच्या रेडिएशनची धग ना ट्रोमन पर्यंत पोहोचली ना जपानच्या राजापर्यंत. हेच सत्य आपल्याला नंतरच्या अनेक लहान मोठे या युद्ध आणि बॉम्स मध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा जाणवेल.

मातृभूमीचा अभिमान आणि राजकीय महत्त्वकांक्षा जरूर असावी पण ती लाखो सर्वसामान्य जीवांचा बळी देऊनच पूर्ण करायला हवी का?

त्यामुळे आज अणुबॉम्ब चे नाव ऐकल्यानंतर कुणावर तरी सूड घेण्याच्या भावनेपेक्षा जपानमध्ये भरडल्या गेलेल्या लाखो लोकांची आपल्याला आठवण आली आणि आपल्या विचारधारेत काहीसा बदल झाला तर मानव जातीचे भविष्य अधिक उज्वल आहे असे म्हणता येईल.

-गंधाली सेवक

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *