–अशोक हवालदार–
हा डिसेंबर मला,
उदास करून जातो.
माझं एक वर्ष,
कमी करून जातो.
महिना सुरू होताच,
नेहमी ठरवतो.
प्रत्येक दिवस तास मिनिटे,
सेकंद मस्त जगतो.
मनातलं सारं सारं,
उतरत जातो.
कविता ब्लॉग मधून,
मन मोकळं करतो.
प्रत्येक क्षणाचं,
सोनं करतो.
वर्षभर करायचं राहिलेलं,
अपूरं काम पूर्ण करतो.
सूर्याला रोज सकाळी,
बजावत असतो.
घाई नाही करायची,
मावळायची महिना संपेस्तो.
आता काही दिवसच,
उरलेत,….तरी सांगतो.
या डिसेंबरचा उत्साह,
त्या वाढदिवसात नसतो.
दिवा फुंकून सजवलेला,
केक कापता.
एक वर्षाने मोठेही,
होत असता.
पण हा डिसेंबर,
थोडा हटके असतो.
शेवटच्या दिवसाची,
आस सर्वांनाच लावतो.
उत्साह सरत्या वर्षासाठी,
की येणाऱ्या नव वर्षासाठी?
डिसेंबर तसाच असतो,
जोशीला प्रत्येकासाठी.
दिवा विझता विझता,
मोठा होतो.
तसंच काहीसं होतं,
डिसेंबर लाडका होऊन जातो.
