एव्हढंच……

डॉक्टर: (फोनवर) शुअर शुअर .. मी येईन .. ओके .. बाय .. (फोन ठेवून) सॉरी मि. देवल, अर्जंट फोन होता .. प्लिज कंटिन्यू .. आपण मरणवेळ विषयी बोलत होता
देवल: हां .. डॉक्टर, मला फक्त इतकंच म्हणायचंय की मला माझी मरणवेळ ठरवण्याचा हक्क हवा. हे पहा, अहो, कुणी झोपेत शांतपणे गेला तर आपण म्हणतो ना सुखाचं मरण आलं .. मला तसंच सुखाचं मरण हवंय .. ते ही माझ्या इष्टवेळी. संतही घेतात ना हो अशी समाधी .. त्याला म्हणता का आत्महत्या .. नाही ना .. मग मी का नाही घ्यायची अशी सुख-समाधी? मी माझं मरण नशिबावर का सोडू? Why take chances?
त्याचं काय आहे डॉक्टर, माणसाला कुठं थांबायचं हे कळत नाही. लहानपणापासून सतत काहीतरी मिळवायचं असतं. पुढं त्याची सवय लागते. Always looking forward to something .. मन धावत राहतं आणि शरीर थकत राहत .. मग पडा खाटेवर आडवे.
मला तसं नाही करायचं. मला योग्य वेळी थांबायचंय .. आता मला सांगा .. माझं ह्यात काय चुकलं?
डॉक्टर : Somewhere I do agree with your perception .. well . देवल, मी माझ्या पेशंटची कधीही हिस्टरी मागवत नाही कारण मला पूर्वग्रह नको असतो. We Psychologists do not get to see the organ rather we need to feel it!
पण तुमची केस वेगळी दिसती आहे. मी तुमची केस हिस्टरी बघेन
I need to see why just a perception requires psychology treatment!
देवल : मलाही माहिती नाही हो मला का सायकॉलॉजिस्टकडं पाठवतात .. हां .. मी फक्त एव्हढंच म्हटलं होतं की .. अशी ही सुख-समाधी मी माझ्याआधी, माझ्या काही आवडत्या लोकांना कंपलसरी देणार आहे .. त्यानुसार लिस्ट केली आहे, छान प्लॅनिंग केलं आहे. म्हणजे मृत्युनंतरच्या जगातही आम्ही सगळे एकत्र असु .. एव्हढंच!
– ओंकार संगोराम