दारची फुले

महाकवि कालिदास जन्‍मशताब्‍दी निमित्‍त

महाकवि कालिदास हे संस्कृत भाषेतील अभिजात लेखक, महान कवी आणि नाटककार होते. आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदासांचा जन्मदिवस म्हणून साजरा होतो.

त्‍यांच्‍या जन्‍मदिन व जन्‍मस्‍थाना बाबत ठोस माहिती उपलब्‍ध नाही पण असं मानलं जातं की त्‍यांचा जन्म एक ते तिसरी शताब्दी ईसा पूर्व झाला होता. त्‍यांच्‍या जन्माबद्दल वेगवेगळ्या पंडितांची वेगवेगळी मते आहेत. अनेक पंडितांनी असे अनुमान केले की महाकवि कालिदासाचा जन्म १५० ईसा पूर्व ते ४५० ईसवी दरम्यान झाला असावा. अनेक संशोधनांनुसार असे मानले जाते की महाकवि कालिदास गुप्त काळात जन्मले असतील, यामागे तर्क असा दिला जातो की महाकवि कालिदासाने “मालविकाग्निमित्रम्” या नाटकाला अग्निमित्राच्या आधारे लिहिले होते आणि १७० ईसा पूर्वात अग्निमित्र राजसत्ता गाजवत होता. महाकवि कालिदासाचा उल्लेख ‘हर्षचरितम’ नामक ग्रंथात सहावी शतकी बाणभट्टने केला आहे. यानुसार, महाकवि कालिदासाचा जन्म पहिल्या शतकाच्या इ.स.पूर्व ते तिसऱ्या शतकाच्या इ.स. दरम्यान झाला असे मानले जाते. कित्‍येक इतिहासकारांच्या मते असे मानले जाते, की महाकवि कालिदासाचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहरात झाला असावा, कारण कालिदासाने आपल्या खंडकाव्य मेघदूत मध्ये उज्जैन शहराचे अनेक वेळा वर्णन केले आहे. ज्या प्रकारे महाकवि कालिदासाच्या जन्मतारखेबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत, त्याचप्रमाणे ते कुठल्या ठिकाणी किंवा कोणत्या राज्यात जन्मले असावेत, याबाबत विद्वानांमध्ये खूप भ्रम आहे; तरीही कालिदासा विषयी असे म्हटले जाते की आपल्या प्रारंभिक आयुष्यात त्यांना अशिक्षित आणि मूर्ख मानले जात होते. असेही म्हणण्यात आले आहे की १८ वर्षाचे होई पर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान नव्हते.

कालिदासाबद्दल हेही म्हटले गेले आहे की जेव्हा सर्व ज्ञानी एकत्र येऊन कोणत्या तरी अज्ञानी व्यक्तीच्या शोधात होते, तेव्हा ज्ञानी लोकांची नजर कालिदासावर पडली. साहित्यातील कथांच्‍यानुसार कालिदासाला खूपच सुंदर व्यक्ती मानले गेले आहे. कालिदासाबद्दल खंडकाव्य मेघदूतमध्ये म्हटले गेले आहे की उज्जैन शहरात त्यांचा जन्म झाला होता, तर काही तज्ञांचे मानणे आहे की कालिदासाचा जन्म उत्तराखंड मध्ये झाला असावा. याच कारणासाठी उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील कविल्का गावात कालिदासाची मूठ आणि सभागृहाचीही निर्मिती करण्यात आली आहे.

कालिदास म्हणजे कालीचा सेवक किंवा दास. असे मानले जात होते की माता कालीचे आशीर्वाद त्यांना मिळाले होते. त्यांनी विद्या मिळवली आणि महापंडित, महाज्ञानी बनले. ज्ञान मिळवून जितक्‍या रचना कालिदासाने केल्‍या, त्यांना जगात प्रसिद्धी मिळाली आहे आणि त्यांची गणना जगातील सर्वोत्तम नाटककार आणि कविंमध्‍ये केली जाते. कालिदासाने लिहिलेल्‍या एकूण रचनां पैकी ७ रचना सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. महाकाव्य- रघुवंश, कुमारसंभव, खंडकाव्य- मेघदूत, ऋतुसंहार, नाटक- अभिज्ञान शाकुंतलम्, मालविकाग्रिमित्र, विक्रमोर्वशीय.

कालिदासाला, कालिमातेच्या कृपेने ज्योतिषशास्त्राचे ज्ञान प्राप्त झाले होते. त्याने ‘उत्तरकालामृतम्’ आणि ‘ज्योतिर्विद्याभरणम्’ असे ज्योतिःशास्त्रविषयक दोन ग्रंथ लिहिल्याचे म्हटले जाते. त्याच्या काही रचना ‘शृङ्गारतिलकम्’, ‘शृङ्गारशतकम्’ आणि ‘श्यामादण्डकम्’ अशाही आहेत. महाकवी कालिदास हे एक शास्त्रीय संस्कृत लेखक होते, त्यांना भारतीय संस्कृत व प्राकृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून ओळखले जाते. त्यांची नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत. त्‍यांच्‍या साहित्यात तीन नाटके, दोन खंडकाव्ये आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो.

कालिदासाने ‘मालविकाग्निमित्र’ , ‘शाकुंतल’ आणि ‘विक्रमोर्वशीय’ ही तीन नाटके, ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’ ही दोन महाकाव्ये, आणि ‘मेघदूत’ हे खंडकाव्य; तसेच ‘ऋतुसंहार’ हे निसर्गवर्णनपर काव्य रचले आहे. या व्‍यतिरिक्‍त. इतरही काही सुभाषिते, स्फुटकाव्ये आहेत. विद्वत्ता आणि रसिकता यांच्या जोडीला कालिदासाचे आणखी काही विशेष आहेत- सूक्ष्म निरीक्षणशक्ती, मनोहारी सौंदर्यदृष्टी, मानवी भावभावनांचा अचूक अभ्यास आणि त्या काळच्या सामाजिक व भौगोलिक परिस्थितीचे सखोल ज्ञान. त्याच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे अलंकारांनी नटलेली भाषा आणि त्यातही तरल अशा उपमा अलंकारांचे अनुपमेय सौंदर्यदर्शन हे होय. त्यामुळेच ‘उपमा कालिदासस्य’ असे गौरवोद्गार त्याच्याविषयी काढले जातात. पाश्चात्त्य विद्वानही कालिदासाचा उल्लेख ‘कविमुकुटमणि’ म्हणून आदराने करतात.

लग्नानंतर कालिदासाच्या जीवनात अनेक आव्हाने आली. इतिहासात मिळालेल्या माहितीनुसार कालिदासाचे खाजगी जीवन आव्हानांनी भरलेले होते, पण त्‍यामुळेच त्यांची महाकवी कालिदास बनण्यास सुरुवात झाली. कालिदासाचे लग्न विद्योत्तमाशी झाले, पण लग्नानंतर विद्योत्तामला हे चांगले ज्ञात झाले की कालिदास मंद बुद्धीचा व्यक्ती आहे. या विषयीच्‍या आख्‍यायिके नुसार गावातील लोकांनी कालिदासाला एक सुशिक्षित बुध्‍दीवान म्‍हणून राजापुढे उभे केले. त्‍याच्‍या मूर्खपणाचं भांडं फुटू नये म्‍हणून लोकांनी कालिदासाचं कडक मौनव्रत असून तो राजाशी काही संवाद साधू शकणार नसल्‍याचं सांगितलं. राजाला कालिदास आपला जावई म्‍हणून पसंत होता. विदयोत्‍तमानेही त्‍याच्‍याशी विवाह करायला एका अटीवर संमती दिली, की कालिदासाने आपले बुध्‍दीचातुर्य तिला सिध्‍द करून दाखवावे. लवकरच कालिदास मूर्ख असल्‍याचं चतुर विदयोत्‍तमाने जाणले आणि त्यामुळे विद्योत्तामा खूप नाराज झाली आणि कालिदासाला म्हणाली की जोपर्यंत तू ज्ञानी होत नाहीस, तोपर्यंत घराकडे परतू नकोस. आपल्या पत्नीच्या कडून मिळालेल्या या अपमानामुळे कालिदास खूप दु:खी झाले, आणि त्यांनी ज्ञानी पंडित होत नाही, तोपर्यंत घरी परत न येण्‍याचा संकल्‍प केला्. या विचारसरणी आणि मजबूत मनोभावनेने त्यांनी आपल्या घराचा त्याग केला. कालिदासाने त्याच्या ‘मेघदूत’ या काव्याचा प्रारंभ ‘कश्चित्’ या शब्दाने केला आहे. तो भटकत, भटकत काही ना काही शिकत वाराणसीत पोचला. त्याने कालिमातेची उपासना, आराधना करून तिचा वरदहस्त मिळवला आणि तो महापंडित झाला. तो कालिदास हे नाव धारण करून स्वगृही परतला. पत्नीने त्याला ओळखले आणि विचारले, ‘अस्ति कश्चित् वाग्विशेषः?’ म्हणजे ‘तुझ्या वाणीत काही विशेष आहे का?’ म्हणजेच ‘तू काही ज्ञानप्राप्ती केली आहेस का?’ कालिदासाने तीन काव्ये पत्नीच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल रचली. तिच्या प्रश्नातील पहिला शब्द ‘अस्ति’, त्याने सुरू होणारे ‘कुमारसंभवम्’, दुसरा शब्द ‘कश्चित्’, त्याने सुरू होणारे ‘मेघदूत’ आणि तिसरा शब्द ‘वाक्’, त्याने सुरू होणारे ‘रघुवंशम्’. भाष्यकारांनी ‘कश्चित्’ शब्दाने मेघदूताचा प्रारंभ करण्याचे कारण शोधण्यासाठी या दंतकथेचा आधार घेतला आहे!

कालिदासाच्या काव्यकल्पनामध्ये शाश्वत सौंदर्य आणि मानव-अभिव्यक्तीचे मजबूत संमिश्रण दिसून येते. कालिदासाच्या रचनां मध्ये मानव जीवनाच्या मूलभूत विधा आणि विशेषतांचे प्रकाश-पुंज प्रत्यक्ष दर्शन होते. ते जीवनाच्या शुद्ध आणि व्यावहारिक बाजूचा विस्तृत आणि सत्यापित अनुभवावर आधारित दर्शन करतात. ‘कुमारसंभव’च्या आठव्या अध्यायात वर्णन केले आहे की कसे नवदाम्पत्या मध्ये बांधलेल्या युगळांनी सहजपणे एकमेकांना समजून घेत आत्मसात करणे आवश्यक आहे. कालिदास यांच्या रचनांनी अनेक संतोषजनक अनुभवांच्या वर्णनाद्वारे आजच्या नागरी जगात व्याप्त आणि संचित तणावा पासून मुक्त होण्यास महत्त्वपूर्ण ठरू शकतात. महाकवी कालिदास यांच्या रचनांमध्ये मुख्यतः तीन नाटकं आणि तीन महाकाव्य उपलब्ध आहेत. वेळेच्या प्रवाहात त्यांची किती अन्य रचनां गायब झाली, हे आजही एक रहस्य आहे. त्‍यांची उपलब्ध ‘नाटके’ पुढीलप्रमाणे आहेतः १. मालविकाग्निमित्रम्, २. विक्रम – उर्वशीयम्, ३. शाकुन्तलम्. पुढीलप्रमाणे ‘महाकाव्य ‘आहेत: १. मेघदूतम्, २. रघुवंशम्, 3. कुमार सम्भवम्

 कालिदास यांच्या रचनांच्या महानतेबद्दल विद्वान आणि समीक्षक यांमध्ये मतभेद आहे. काही म्हणतात की ‘कुमारसम्भवम्’ त्यांच्या काव्य प्रतिभा आणि सूक्ष्म प्रतिपादन क्षमतेचे प्रदर्शन करते, तर इतर ‘ शकुंतलम्’ नाटकाला श्रेष्ठ आणि अद्वितीय रचना मानतात. या विषयावर एक लोकोक्ति देखील प्रसिद्ध आहेः “काव्येषु नाटकम् श्रेष्ठम् तत्र शाकुन्तलम् मतं”

कालिदास गुप्तकालातील संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार होते. त्यांनी भारताच्या पौराणिक कथां आणि तत्‍वज्ञानाला आधार म्हणून रचना केल्या आणि त्यांच्या रचनांमध्ये भारतीय जीवन आणि तत्‍वज्ञानाची विविध रूपे आणि मूल तत्व दर्शवली आहेत. कालिदास त्यांच्या याच वैशिष्‍टयांमुळे राष्ट्राची एकत्रित राष्ट्रीय चेतना दर्शवणारे कवी मानले जातात आणि काही विद्वान त्यांना राष्ट्रीय कवी म्हणून मान्यता देखील देतात. त्‍यांच्‍या अभिज्ञान शांकुंतलमचं युरोपीय भाषां मध्‍ये भाषांतर झालं आहे. मेघदूत कालिदासची सर्वोच्च रचना आहे ज्यामध्ये कवीची कल्पनाशक्ती आणि अभिव्यंजनावादाची भावना आपल्या सर्वोत्तम स्तरावर आहे.

मेघदूत हे कवी कालिदासाने रचलेले संस्कृत भाषेतील खंडकाव्य आहे. मेघदूत काव्यात १११ श्लोक आहेत. असे मानले जाते की सुरचित रामटेकने कालिदास यांना प्रसिद्ध कवितेची रचना कार्यास प्रोत्साहन दिले. मेघदूत हे कवी कालिदासाने रचलेले संस्कृत भाषेतील खंडकाव्य आहे. हे खंडकाव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे. या खंडकाव्याचा रचनाकाळ गुप्तकाळात इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडांतला असल्याचे मानले जाते. पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला मेघाबरोबर पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे. मेघदूताचे कथानक हे “विप्रलंभ शृंगार” या प्रकारात मोडणारे आहे. त्यात पत्नी आपल्याबरोबर नसल्याने यक्ष शोक करतो आहे. यासाठी कालिदासाने “मंदाक्रांता वृत्‍त“ वापरले आहे.. नाव सुद्धा अगदी चपखल आहे- मंद + अक्रांता. ती व्यथा ” मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्तिचेत: । कंठाश्लेषप्रणयिनीजने किम् पुनर्दूरसंस्थेऽ ॥ अशा श्लोकांमधून प्रभावीपणे व्यक्त होते. शांत शेळकेंनी केलेल्या मेघदूताच्या मराठी अनुवादामध्ये ‘पादाकुलका’ वृत्त वापरले आहे.

मेघदूताचा नायक (यक्ष) अलका नगरीत राहणारा यक्ष हा कुबेराचा एक सेवक होता. आपल्या पत्नीच्या सहवासात रमल्याने नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला, यक्षराज कुबेराने एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली. हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला ‘रामगिरी’ पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने पत्‍नीपासून दूर राहिला असताना, कामीजनांना अत्यंत पीडा देणारा वर्षाऋतू सुरू झाला. तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून आल्या . त्या निर्जन प्रदेशात यक्षाला चेतन व अचेतन याचेही भान राहिले नाही. त्यामुळे त्या यक्षाने मेघालाच दूत कल्पून आपल्या पत्‍नीला निरोप सांगण्याचे काम सोपविले. प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणाऱ्या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन देण्याचे सांगून यक्षाने मेघाची अलका नगरीकडे रवानगी केली. येथेच या काव्याची परिसमाप्ती करण्यात आली आहे.

डॉ. राजेंद्र पडतुरे

-x-x-x-x-x-x-x-

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *