मार्च महिन्याच्या कोड्याचे उत्तर
उभे शब्द
1. जनाबाई – एक वारकरी स्त्री संत, 2. नग – पर्वत , वस्तू मोजण्याचे एकक, 3. नीरव – शांत , ध्वनिरहित, 4. ज्योती देशपांडे – धुरंधर चित्रपटाची निर्माती , रिलायन्स जियो स्टुडिओ ची CEO, 5. देवकी पंडित – एक ख्यातनाम गायिका , आभाळमाया मालिकेची शीर्षक गीत गायिका
6. वत्स – बालक, बाळ , शिशु, 7. धरती – पृथ्वी, 12. रस्सी – दोर , दोरी, 14. शत – शंभर, 18. मासा – मत्स्य, 19. विज्ञापन – जाहिरात, 20. अंगारक – मंगळ ग्रह, 22. करपल्लवी – हाताच्या खुणांची भाषा, 24. त्वचा – कातडी , साल, 26. नवलाई – आश्चर्य , नावीन्य, 27. शवासन – एक योगासन, 31. टन – वजन मोजण्याचे परिमाण, 33. भगर – वरीचे तांदूळ, 36. दधी – दही
आडवे शब्द
1. जननी – आई , माता, 4. ज्योत्स्ना देवधर – एक प्रसिद्ध मराठी लेखिका, 8. नागर – शहरी , नगरवासी, 9. वत्सर – वर्ष , साल, 10. देवकी – वसुदेव पत्नी , कृष्णमाता, 11. तीर – बाण , शर
13. ईश – ईश्वर , देव, 15. पाश – फास, बंधन, 16. पंथ – संप्रदाय , मार्ग, 17. तमा- पर्वा, काळजी
21. साकडे – विनवणी , मागणी, 23. तत्वज्ञान – जीवनाचा अर्थ शोधणारे ज्ञान, 25. गान – गायन
28. चाप – बंदुकीचा घोडा, 29- रव – आवाज , ध्वनी, 30. पळवाट – निसटण्याचा , सुटकेचा मार्ग,
32. नभ – आकाश, 34. कला – कसब, कौशल्य, 35. सनद – अधिकारपत्र, 37. वीजन – पंखा, 38. धीवर – कोळी
–सतीश बर्वे
