
परिचय – योगदान पुरस्कार विजेत्या श्रीमती अलका बोकील
सालाबाद प्रमाणे महाराष्ट्र मंडळातर्फे दिला जाणारा ‘योगदान पुरस्कार’ या वर्षी श्रीमती अलका बोकील यांना प्रदान करण्यात येणार आहे.
त्यांनी कार्यकारिणीची सदस्य म्हणून मंडळाच्या विविध उपक्रमांत अनेक वर्षे भाग घेतला तसेच अध्यक्ष म्हणून आपला कार्यभार उत्तम सांभाळला आहे.
अभिनय असो किंवा संगीताचे शिक्षण असो;
त्यांच्या कलागुणांचा मंडळाच्या रंगभूमीला नेहमीच फायदा झाला आहे. मंडळाच्या ‘रंगदक्षिणी’ ह्या नाट्यस्पर्धेसाठी त्यांनी वेळेला बावीस नाटिकांचे परीक्षण केले आहे.
समाजकार्यात देखील त्या आवडीने सहभागी होत असतात. गेली बारा वर्षे त्या दांडेली येथे जाऊन तेथील आदिवासी मुलींना गणित हा विषय हातोटीने शिकवत आहेत आणि उत्तम विद्यार्थी घडवत आहेत.
श्रीमती अलका बोकील यांचे नाव पुरस्कारासाठी निश्चित करताना महाराष्ट्र मंडळाला आनंद होत आहे.
