सनविवि पुरस्कार अभिमान पुरस्कार – श्रीमती रोहिणी नीलेकणी

अभिमान पुरस्कार – श्रीमती रोहिणी नीलेकणी

परिचय – श्रीमती रोहिणी नीलेकणी 

विश्वस्त मंडळातर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा अभिमान पुरस्कार, या वर्षी ‘श्रीमती रोहिणी नीलेकणी’ यांना प्रदान करण्यात येणार आहे.

 “रोहिणी नीलेकणी फिलान्थ्रॉपीज”च्या त्या  अध्यक्ष आहेत. तसेच “एक स्टेप” या विना-नफा शिक्षण मंचाच्या त्या सह-संस्थापक आणि संचालक आहेत. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा पुढाकार दिसून येतो. 

२००१ मध्ये त्यांनी “अर्घ्यम” फाउंडेशनची स्थापना केली. अर्घ्यमच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील भूजलाची पातळी, पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता अशा पाणी पुरवठ्याच्या संदर्भात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

एक पत्रकार म्हणून श्रीमती रोहिणी नीलेकणी यांनी टाईम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे, मिंट इत्यादी आघाडीच्या प्रकाशनांसाठी लिहिले आहे. श्रीमती रोहिणी नीलेकणी यांची काही पुस्तके देखील प्रकाशित झाली आहेत,  त्यांचे प्रगल्भ विचार लिखाणातून जाणवत राहतात. त्यांचा ‘समाज, सरकार, बाजार’ या नावाचा, अर्थव्यवस्था संतुलनासारख्या गहन विषयावरचा काव्यसंग्रह देखील प्रकाशित झाला आहे.

२०१७ मध्ये त्यांना “अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस” च्या परदेशी मानद सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. 

श्रीमती रोहिणी नीलेकणी “सायन्स गॅलरी बेंगळूरू” आणि “ATREE अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँड द एन्व्हायर्नमेंट” च्या बोर्ड सदस्य आहेत.

एक बहुआयामी, मृदु स्वभावाच्या, परोपकारी व्यक्ती म्हणून श्रीमती रोहिणी नीलेकणी सुपरिचित आहेत. अभिमान पुरस्कारासाठी त्यांची निवड करताना मंडळाला आनंद वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *