–वंदना नाडगौडा–
मंडळाची सहल माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच छान झाली.आयोजकांनी ट्रीपसाठी छान रिसॉर्ट निवडले होते.नाव ‘सुग्गी रिसॉर्ट ‘.भरपूर मोकळी outdoor, indoor जागा,आमराई,वेगवेगळे एडवेंचर गेम्स ,इंडोर गेम्स ( मी फक्त indoor games च खेळले) यामुळे खूप मज्जा आली. आमराई तर मला फार आवडली . फांदी फांदीला लगडलेले आंबे पाहून मन हरखून गेले.अजूनही जिभेवर तिखट मीठ लावलेल्या कैरीच्या फोडीची चव आहे माझ्या. जेवणही मस्त होते.
खूप नवीन ओळखी झाल्या.आबालवृद्ध,स्त्री पुरूष,सर्वच एन्जॉय करताना दिसत होते. शेवटच्या हाऊजी गेममुळे तर खूप धमाल आली.
सर्वांना बोलतं करण्यात आयोजकांनी विशेष
मेहनत घेतल्याचे जाणवलं. सगळ्या तरुण आयोजकांनी वातावरण आनंदी ठेवलं होतं. एकदाही त्यांच्यातला कोणी वैतागलेला दिसला नाही.त्यामुळे एक क्षणही कंटाळवाणा गेला नाही . एकदम relaxed व fresh वाटलं.रोजच्या रुटीन मध्ये खूपच छान चेंज मिळाला.
अशाच छोट्या छोट्या ट्रिप्स मंडळाने वरचेवर आयोजित कराव्यात ही विनंती. महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष माणिकताईंचे ,सर्व आयोजकांचे, मंडळाचे मनापासून खूप खूप खूप आभार!
माझ्या विहिणबाई सौ.अर्पिता जोशी यांनी आवर्जून तेथील जेवण व ब्रेकफास्ट खूप आवडल्याचे कळविण्यास सांगितले आहे.तसेच माणिक ताईंची सदैव सुहास्य मुद्रा त्यांना खूप भावली.माझे व्याही हाडाचे स्पोर्ट पर्सन. त्यांनी
सर्व एडवेंचर गेम्स दोन दोनदा खेळून एन्जॉय केले.
त्यांनीही वर्षातून दोनदा ट्रिप्स आयोजित करावी असे सुचवले आहे.
