अभिप्राय – स्नेहसंमेलन

— सुजाता घाटगे —

*१ मे २०२२ – महाराष्ट्र मंडळ – स्नेहसंमेलन*

१ मे कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो. मराठी राजभाषा दिन बेंगळुरू येथे महाराष्ट्र मंडळ तर्फे फार उत्तम प्रकारे पार पडला.

महाराष्ट्र मंडळ, बेंगळुरू येथील सर्व मराठी मंडळींनी या मंडळात मराठी संस्कृती आणि परंपरा  जपली आहे. असे जाणवतच नाही आपण दुसऱ्या राज्यात राहून दुसऱ्या भाषेशी  जोडले गेलो असलो तरी महाराष्ट्रापासून दूर गेलो आहोत.

१ मे २०२२ ह्या दिवशी महाराष्ट्र मंडळ तर्फे  स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.  त्या दिवशी मला माझे प्रकाशित झालेले दोन काव्यसंग्रह “निळ्या उजेडात” आणि “बंद ओठांमागे* सर्वांसमोर मांडण्याची उत्तम संधी या मंडळाने उपलब्ध करून दिली. त्यासाठी स्टॉल लावण्यात आले होते. याकरता मला सौ. अंजलीताई कुलकर्णी यांनी सुरुवातीपासून फार छान मार्गदर्शन केले. मी अंजली ताईंची खूप आभारी आहे.

तसेच स्नेहसंमेलनात लहान मुलांबरोबर मोठ्यांसाठी सुद्धा वेगवेगळे करमुनिकीचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामुळे तो दिवस आमच्या सर्वांसाठी फार आनंदाचा गेला . नवीन ओळखी झाल्या. बऱ्याच कालावधीनंतर मराठी माणसांमध्ये १ मे या महाराष्ट्र दिनी आम्ही राहिल्यामुळे मनाला एक वेगळीच उभारी आली.

मला महाराष्ट्र मंडळाची सभासद होण्यासाठी सौ. स्मिताताई बर्वे यांनी मदत केली. त्यांच्या गोड, लोभस स्वभावामुळे आम्ही मंडळात पहिल्यांदा आलो असे वाटलेच नाही, इतकी आपुलकीने त्यांनी विचारपूस केली, स्वागत केले.

स्मिताताईंमुळे मी ह्या प्रेमळ, आपल्या कुटुंबाशी जोडले गेले आणि कित्येक नवीन नाती निर्माण झाली. त्यासाठी मी स्मिताताईंची खूप आभारी आहे. 

त्याचबरोबर ह्या मंडळातील अनेक मान्यवरांचे मी आभार मानते. असेच वरचेवर नवीन उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्यात यावे आणि आम्हाला मंडळाने आनंदी सोहळ्यात समाविष्ट करावे आणि मला खात्री आहे, या सर्वांशी माझे नाते आणखी घट्ट होणार.

सर्वांचे खूप खूप आभार. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *