सनविवि परीक्षणे मला आवडलेला दिवाळी अंक

मला आवडलेला दिवाळी अंक

साहित्यकलामंच दिवाळी अंक २०२१

–अविनाश चिंचवडकर —

“महाराष्ट्राबाहेर राहून मराठी अस्मिता जपणारा अंक” असे ब्रीदवाक्य असलेला आणि बृहनमहाराष्ट्रातून प्रकाशित झालेला हा पहिलाच दिवाळी अंक खूप वैशिष्टपूर्ण आहे! मुख्यत्वे बेंगळुरू, हैदराबाद, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील साहित्यिकांचे साहित्य यात आहे.

या अंकाचे खूप वेगळे असे मुखपृष्ठ चितारले आहे, बेंगळुरूमधील दिपाली वझे यांनी! अंकाचे संपादन स्मिता बर्वे आणि व्यवस्थापन श्री रोहित आहेर यांनी केले आहे. सहसंपादक कल्याण आडत आहेत. याशिवाय अनिकेत पुजारी, रेवती कुळकर्णी, मंदार अयाचित यांनी अंकाच्या प्रकाशनासाठी मदत केली आहे.

चित्रकार वैभवी शिंपी यांनी रेखाटलेल्या सुंदर चित्राने आणि मारुती रेवणकर यांनी लिहिलेल्या गणेश वंदनेने अंकाची सुरुवात होते.

“कैवल्यग्रामचे निवासी” या लेखात ऋषिकेश मोघे यांनी सुप्रसिद्ध गायक भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर, पं. मल्लिकार्जून मन्सूर या गायकांच्या आठवणी जागवल्या आहेत.

दुसरा वैशिष्ट्यपूर्ण लेख मेघदूत या काव्याबद्दल व्यंकटेश कुलकर्णी यांनी लिहिला आहे. मेघदूत या महाकाव्याचे सार केवळ आठ कडव्यात त्यांनी सुंदरपणे चितारले आहे.

“होयसळ मंदिरे” हे मुक्ता कुलकर्णी यांचे बेलूर, हळेबीडूचे प्रवासवर्णन खूप अभ्यासपूर्ण आहे.

“निनाद ए क्रिएटिव्ह बझ” हा पुरूदत्त रत्नाकर यांचा वेगळा लेख, कल्याणी आडत यांचा “रंग उन्हाचे” हा ललित लेख, “सिनेमा वयात आला” हा दिपाली गुरव यांचा भावूक करणारा लेख, “I quit” ही जादूगर धनश्री पावणसकर यांची रहस्यकथा, “समोरच्या घरातील खिडकी” हा शिल्पा धर्माधिकारी यांची विनोदी कथा, न्यायालयीन कामकाजावर आधारित “त्या दोघी’ ही अ‍ॅडव्होकेट सुनील गानू यांची उत्कंठावर्धक कथा असा भरगच्च वाचनीय मजकूर या अंकात आहे.

याशिवाय अंकात अनेक मनोरंजक कथा आहेत. स्मिता बर्वे यांची “प्राक्तन”, सौ सुनिता केदारे यांची “पंगत”, राधिका मराठे यांची “दरवाजा”, “पाऊलखुणा” ही सौ. सुषमा वडाळकर यांची कथा, “श्वापद” ही अविनाश चिंचवडकर यांची कथा, अनिकेत पुजारी यांची “वारी” ही वेगळी कथा, “गुडबाय” ही अंजली संगवई यांची गूढकथा, “निसर्गाची शिकवण” ही दिपाली वझे यांची कथा, “कोणास ठाऊक” तारा गोपीनाथ, “गुलमोहोर” स्नेहल महाजन, “वाटेकरीण” सौ प्रतिभा परांजपे, “आतुरता” सौ रश्मी पिंप्रीकर, “गुलजामगड्डू” मुकेश अयाचित, “गोष्ट नात्यांची “ जयश्री लुकतुके, “स्त्रीशक्ती” नीलिमा राव, “त्या तिथे पलीकडे” ही आदिती राव यांची कथा, हे सगळे साहित्य खूपच वाचनीय आहे.

“जगणं एक आनंद यात्रा” या लेखात कसे जगावे हा सांगणारा वैशाली सुळे यांचा लेख, “शुभमंगल वेळीच सावधान” हा डॉ. स्वप्नाली पंडित माहितीपूर्ण लेख, “सुख पाहता जवापाडे” डॉ. अनुराधा भागवत यांचा चिंता आणि काळजीला कसे दूर पळवावे याबद्दलचा लेख, स्ट्रेस कसा कमी करावा याबद्दलचा मंदार अयाचित यांचा माहितीपूर्ण लेख, “सर सलामत” हा विद्या गोवर्धन यांचा हेल्मेट बद्दलचा लेख असे अनेक एक माहितीपूर्ण लेख आहेत

अंकातील दोन ग्रामीण कथा पण अंकाची रंगत वाढवतात. “शर्यत” ही रेवती कुलकर्णी, “शेवटी नंद्या घरी सुखरूप परत आणला” ही रोहित आहेर यांची कथा दोन्हीही कथा उल्लेखनीय आहेत.

याव्यतिरिक्त अंकात बालसाहित्य विभागही आहे.त्यात कु. ओवी कुलकर्णी, सुरभी आठवले यांच्या कथा, नीता कुलकर्णी यांची कविता आणि मुलांनी काढलेली सुंदर चित्रे आहेत.

अंकात खूप सुंदर गझला आणि कविता पण आहेत. कवी स्नेहदर्शन, सौ, विद्या चिडले, प्रणव बनसोडे, अजिता पणशीकर, सौ. सीमा काळे, सौ. सुरेखा वाणी, तुषार भट, सुजाता घाडगे, सीमा चाफेकर, मानसी महाजनी, सुरजकुमारी गोस्वामी, कविता पुणतांबेकर, गायत्री उत्पात, अंजली मराठे, मीरा देशमुख, प्रेरणा चौक, भूषण कुलकर्णी, हेमंत सारोळकर, सौ. मेघा भिडे, श्रेयस पावणसकर यांच्या वैविध्यपूर्ण कविता यात आहेत.

अंकाच्या शेवटी महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या मराठी ग्रुप्सची उपयुक्त माहिती आहे.
अंकाची उत्कृष्ट छपाई, मांडणी, चांगल्या दर्जाचा कागद, आकर्षक मुखपृष्ठ, निर्दोष संपादन ही अंकाची अजून काही वैशिष्ट्ये आहेत.


******





Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *