सनविवि माहितीपूर्ण लेख वनौषधी -कोथिंबिर आणि पार्स्ले

वनौषधी -कोथिंबिर आणि पार्स्ले

–सौ. विद्या चिडले. —

कोथिंबीर आपल्या जेवणातली रंगत व लज्जत वाढवणारी एक मस्त वनस्पती आहे. ही वनस्पती आपण आपल्या छोटेखानी बागेत लावू शकतो.
चांगली कसदार माती खत मिसळून कुंडीत भरली तर कोथिंबीर चांगली उगवते. पण खत नसेल किंवा माती कसदार नसली तरी चालेल. कुठल्याही ऋतूत कोथिंबीर येते. फक्त जास्त पाणी किंवा जास्त ऊन असल्यास कमी उगवते. जास्तीचं पाणी कुंडीत राहणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते. सबंध धने आणून ते चप्पलने, लाकडी फळीने किंवा खलात रगडून फोडून नंतर पेरावे लागतात.
हे फोडलेले धने कुंडीत घालून व पुन्हा मातीचा पातळ थर वर टाकून नंतर झारीनी थोडे पाणी हलकेच टाकावे.
सहा सात दिवसांत छान पालवी फुटायला लागते.
जास्त पाणी घालू नये. पाणी रोज घातले नाही तरी चालते.
पस्तीस चाळीस दिवसात छान रोपं तयार होतात.

अशी ही कोथिंबीर जेवणातील पदार्थांची शोभा वाढवते. जेवण चविष्ट करते. घरची ताजी कोथिंबीर पदार्थाची आणखीनच चव व रंगत वाढवते. आपल्या बागेत मोठ्या कुंडीत केव्हाही लावू शकतो.
कोथिंबीरीत फाॅस्फोरस, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, अ-ब-क ही जीवनसत्वे असतात. आयुर्वेदातही कोथिंबीरीचे औषधीगुण सांगितले आहेत. कोथिंबीरीमुळे अपचन दूर होते. पाचन वाढते. हाडांची मजबूती वाढते. ॲलर्जिमुळे होणाऱ्या दाहावर कोथिंबीरीचे पाणी किंवा लेप लावतात. तसेच धनेपण आरोग्य संवर्धन करतात. धन्यामध्ये फाॅस्फोरस, मॅग्नेशियम, सोडियम भरपूर असते. तसेच धने रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यायल्यास उन्हाळ्यात अंगाची लाही कमी होण्यास मदत होते.
पुडाची वडी, भाजी, पराठे, कोथिंबीर भात, असे पदार्थ आपण करतोच. भाज्या, सॅलड, कडधान्याचे पदार्थ, सूप, सार, ह्यावर बारिक चिरलेली कोथिंबीर टाकली की डोळ्यांचे पारणे फिटते, पदार्थाची लज्जत वाढते. तशी कोथिंबीर पदार्थाच्या सजावटील मुख्य घटक आहेच. अशी ही कोथिंबीर आपल्या बागेत लावण्यास सोपी आहे.

पार्स्ले…..
कोथिंबीरीसारखीच दिसणारी व कोथिंबीरीसारखेच औषधीगुणधर्म असलेली व आजकाल काॅन्टिनेन्टल फुडवर जास्त प्रमाणात उपयोगात येणारी दुसरी वनस्पती म्हणजे पार्स्ले. मोठमोठ्या उपाहारगृहात शेफ ह्या वनस्पतीचा सध्या खूप वापर करताना दिसतात.
जगाच्या मध्यपूर्व भागात, युरोपियन देशात, अमेरिकेत व आपल्या देशाच्या पूर्वोत्तर भागात ही वनस्पती पदार्थांची लज्जत व रंगत वाढवण्यास वापरतात. पास्ता, पिझा सॅडल्स, सूप व इतर अनेक पदार्थांवर garnishing, topping agent म्हणून उपयोग होतो.
पार्स्लेमध्ये पण अ,ब आणि क ही जीवनसत्वे आहेत. किंबहुना कोथिंबीरीपेक्षा थोडी जास्त प्रमाणात आहेत. ह्याच्या काड्या थोड्या जरड असतात. ह्याची चव सौम्य असते. पार्स्ले वाळवून रेफ्रिजरेटरमध्ये एअर टाईट डब्यात ठेवता येतात.
कोथिंबीरीची पाने वर गोलसर असतात तर पार्स्लेची पाने टोकदार असतात. ह्याचे दोन प्रकार आढळतात. एक सपाट पानं असलेला व दुसरा कर्ली पानाचा.
पार्स्लेचे आणखी काय औषधी गुणधर्म आहेत ह्याची विश्वसनीय माहिती नाही. परंतू कोथिंबीरीसारखीच हाडांना उपयोगी आहे. तसेच इतरही अनेक फायदे आहेत. पण कोथिंबीरीप्रमाणेच पार्स्लेच्या अती सेवनाने ॲलर्जी वाढते.
पार्स्ले सौंदर्य प्रसाधनात, साबणात, अत्तर तयार करताना सुगंधी द्रव्य म्हणून वापरतात. ताज्या पानांचं ज्यूस करतात. पण खूप प्रमाणात ह्याचे सेवन योग्य नाही. फक्त garnishing, topping आणि taste enhancing ingredient म्हणून उपयोगात आणतात. पार्स्लेच्या बिया सरबतात टाकतात. तसेच पार्स्लेच्या ताज्या पानांच्या रसाचा insecticide म्हणून उपयोग करतात. continental food बनवत असाल तर आपल्या बागेत पार्स्ले लावायला हरकत नाही.
पार्स्लेची रोपं रोपवाटिकेतून आणून कुंडीत लावावीत किंवा पार्स्लेचं बी ऑनलाईन मागवून तेही लावता येतात. आधीच्या रोपांची वरची पानं कापून त्याच्या दांड्या पुन्हा लावतात. कुंडीत पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीने माती भरून नंतर रोपं लावावीत.बिया लावण्यापूर्वी एक रात्र भिजत ठेवून नंतर लावल्यास लवकर रुजतात व कोम फुटण्याचा कालावधी कमी होतो. कारण पार्स्लेच्या बियांना germinate व्हायला वेळ लागतो. पार्स्लेच्या काड्या आधी एक दोन दिवस पाण्याच्या जारमध्ये ठेवाव्या व नंतर कुंडीत लावल्यास त्या काड्यांना पुन्हा छान पालवी फुटते.
पार्स्ले लावलेली कुंडी काही वेळे ऊन्हात ठेवावी. पण जास्त ऊन उपयोगाचे नाही. थंड हवामान ह्या वनस्पतीला पोषक ठरते.चार पाच महिन्यात छान पालवी फुटते.
कोथिंबीर पार्स्ले
१]चव उग्र कमी उग्र किंवा
(pungent) किंचित तुरट
२]पानं काड्या दांड्या जरड
बियांचा उपयोग. असतात.
३]पानं गोलाकार पानं टोकदार.
४] दोन प्रकार
फ्लॅट व curly
leaf.
५]lemony grassy
६]पानं तोडली की trimming
पुन्हा वाढत नाही. केल्यानंतरही
पुन्हा पालवी
फुटते.
७]कोथिंबीर लवकर पूर्ण वाढ पाच
वाढते. ३५ते४० महिन्यात होते
८]कोम फुटायला कोम दोन तीन
सहा सात दिवस. आठवड्यात
फुटतात.
९]spicy citracy mild herbal
सुगंध scent.
१०]केंव्हाही लावता थंड हवामान
येते. योग्य असते.
थोडे ऊन हवे
असले तरी.
११]कोथिंबीर पार्स्ले
बाळबोध नवीन वळणाची
१२]पाणी रोज पार्स्लेला रोजही
न देता तीन चार रोज पाणी
दिवसांनी दिले तर लागत नाही.
चालते.जास्त उन्हं
असतील तर रोज
थोडा शिडकावा
द्यावा.
१३]कोथिंबीर पार्स्लेची दोन
लवकर फुलावर तीन इंचाची
येते. पानं असलेली
काडी तोडली
की पुन्हा
पालवी फुटते.
१४]कोथिंबीरीची पार्स्लेची मुळं
मुळं उपयोगात pungent
येत नाहीत. असतात. व
वापरतात.
१५]कोथिंबीरीची पार्स्लेची लिंबू
आपण विविध लसूण घालून
प्रकारे चटणी चटणी करता
करतो. येते.
वर दिल्याप्रमाणे ह्या दोन्ही वनस्पतीत फरक आहे. दोन्हीचे गुणधर्म उपयोग थोड्याफार प्रमाणात सारखेच असले तरी ज्या प्रदेशात जी वनस्पती वाढते ती सहज उपलब्धही होते व ती लावणे आपल्याला सोईचे वाटते. पण continental food सोबत पार्स्लेचे topping, garnishing जास्त शोभते. तसेच ह्या पदार्थांची चव enhance करते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *