यशोगाथा

यशोगाथा…ओळख व्यक्तिमत्त्वाची…

बेंगळूरु मधील एक यशस्वी महिला म्हणून, सौ. माणिक अजय पटवर्धन यांचे नाव घेता येईल. मी कॉलेज मल्लेश्वरम येथून वाणिज्य शाखेत बी.कॉमची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डी.एड केले आणि काही वर्ष नोकरी केली.

            Telegraph Assistant म्हणून Central Telegraph Office मधे, Lyl Genesis मधे Chief coordinator,  कथालया  मधे Director co-ordinator अशी अनेक 

पदे भूषविली. अनेक गावं पाहिली आणि विविध स्तरावरील लोकांबरोबर संवाद साधला. पुढच्या आयुष्यात त्यांना ह्या अनुभवाचा मोठा फायदा झाला.

            पालकांना आपल्या मुलांची लग्न जुळवताना येत असलेल्या अडचणी पाहून त्यांनी एक विश्वसनीय विवाह संस्था काढायचे ठरवले आणि त्यानुसार  २००४ साली ‘ WAY2WED ’ ही संस्था  बेंगळूरुमध्ये सुरू केली. आज २२ वर्ष ही संस्था कार्यरत आहे, इतकेच नव्हे तर २०२५ साली त्यांनी अमेरिकेत चार ठिकाणी संस्थेच्या शाखा सुरू करून आपल्या कार्याची व्याप्ती वाढवली आहे.

            २००७ मध्ये त्यांनी ‘ स्वकृता चॅरिटेबल ट्रस्ट ’ ची स्थापना केली. महिलांनी आपली आर्थिक उन्नती करावी,आत्मनिर्भर व्हावे याकरता ही संस्था सातत्याने प्रयत्नशील असते. माणिकताईंच्या मार्गदर्शनाखाली स्वकृताला आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान तर्फे बेस्ट NGO ची ट्रॉफी मिळालेली आहे. हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे. 

            आज स्वकृता विविध संस्थांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवित असते. संस्थेद्वारे महिलांना अर्थार्जनाच्या दृष्टीने योग्य ते प्रशिक्षण दिले जाते तसेच प्रदर्शन भरवून स्वकृताच्या सदस्यांनी चालू केलेल्या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. संस्थेच्या इ वेब बुलेटिन या माध्यमातून विविध स्तरावरील यशस्वी महिलांबद्दल माहिती देण्यात येते व उद्यम करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाते.  पुणे आणि चिंचवडला स्वकृताच्या शाखा आहेत. ज्यात 300 महिला जोडल्या गेल्या आहेत.

            माणिकताईंनी लिहिलेल्या ‘ Hundred home business ideas for home makers ’ या  पुस्तकाला पसंती मिळत आहे, ह्यातच त्यांच्या यशाचे गमक आहे. विशेष म्हणजे इंग्रजी आणि कन्नड भाषेत हे उपलब्ध आहे. ‘ गृहिणींसाठी शंभर गृह उद्योग ’ ही  मराठी लवकरच आवृत्ती लवकरच प्रकाशित होणार आहे.या खेरीज त्यांचा

‘ धर्म संकट ’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे तसेच त्यांनी लिहिलेल्या अनेक बालकथा; निरंतर शिक्षण अभियानांतर्गत महाराष्ट्र सरकारने १०००० प्रती छापून गावोगावी वाचनालयात ठेवल्या आहेत .

            माणिकताईंनी ‘ स्टीलच्या भांड्यांची बँक ’ हा मोफत उपक्रम स्वकृताच्या माध्यमातून सुरू केला आहे. त्याचा अनेक लोकांना फायदा होत आहे.

बेंगळूरुच्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीत त्या नऊ वर्ष कार्यरत होती. त्या दरम्यान मंडळाचे मुखपत्र असलेल्या स.न.वि.वि.च्या  संपादक,खजिनदार,उपाध्यक्ष आणि अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत.

            करोना काळात ऑनलाईन कन्नड क्लासेस सुरू करून त्यांनी इतर राज्यातून येणाऱ्या लोकांना संभाषणाला मदत केली. हे क्लासेस अजूनही सुरू आहेत. 

उत्तम सहकारी आणि कुटुंबीयांचे पाठबळ लाभल्याने ही वाटचाल सुकर झाली असे त्या नमूद करतात.

अनेक संस्थांनी पारितोषिक देऊन माणिकताईंच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांना पुढील वाटचालीकरता अनेक शुभेच्छा!

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *