रविवार 6 मार्च रोजी पहाटे शांत झोपेत, सॊख्य,खारघर, नवी मुंबई येथील राहत्या घरी, सौ मंजिरी पंकज पंडित(वय 54) यांचे प्राणोत्क्रमण झाले
माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. chemotherapy नंतर एका आठवड्यात शस्त्रक्रिया योजली होती, परंतु याआधीच त्यांना देवाज्ञा झाली त्यांच्या मागे त्यांचे पती पंकज आणि मुलगी, चि प्रसन्ना आहेत.
अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनं ।
देहि मे कृपया शम्भो त्वयि भक्तिं अचन्चलं ॥
O shambho, If i have unflinching devotion to you, then i am assured of a death without any pain and a life of abundance
कै. मंजिरीचे संपूर्ण जीवन आणि तिचा सहज मृत्यू या सुंदर श्लोकातून व्यक्त होत आहे.
अल्प परिचय : मंजिरी (पूर्वाश्रमी चे आडनाव वेलणकर) यांनी मुंबई च्या ML डहाणूकर महाविद्यालयातून B.Com. ची पदवी घेतली. त्या व्यवसायाने लेखापाल (अकाउंटंट ) होत्या.
मुंबईला खाजगी कंपनीत, कामं केल्यानंतर, पतीच्या बरोबरं त्या 2005 साली, शोभा ओपल, बंगलूरू येथे स्थायिक झाल्या. त्यानंतर एअर इंडिया, बंगलूरू (2007 ते 2009)आणि symbiosys या संस्थेच्या SIMC (Symbiosys Institute of Media and Communications) येथे प्रमुख लेखपाल (2009 ते 2019 )म्हणून कार्य केले.
आपुलकी या महिला मंडळत त्यांचा सक्रिय सहभाग होता, एक सदस्य म्हणून आणि लेखपाल म्हणून सुद्धा.
SLK Foundation या 25 वर्ष, कार्यरत असलेल्या सार्वजनिक धर्मदाय संस्थेच्या, मंजिरी पंडित या विश्वस्त होत्या.
SLK Foundation,(ब्रीद वाक्य, समस्यातून संपत्तीकडे) तर्फे पर्यावरण रक्षण साठी तीन उपाय योजिले आहेत
1 घन कचऱ्याचे खत.
2 पाण्याचे प्रदूषण थांबवणे.
3 सौर ऊर्जेचा वापर करून, छप्परावरील panels ने वीज बनवणे.
या व्यतिरिक्त SLK Foundation, बंगळूरू च्या अनेक उपक्रमात त्यांचा मोठा सहभाग होता.
1 मधमाशाचे जतन करून शुद्ध मध विकणे आणि
2 SLK Foundation दर वर्षी(2009 पासून 2019 पर्यंत ) The Bombay Art Society च्या सहकार्याने, कर्नाटक चित्रकला परिषद येथे, चित्रांचं प्रदर्शन भरवत होते. यामुळे महाराष्ट्रातील नवीन, होतकरू चित्रकारांना, बंगळूरू येथे एक नवीन बाजार पेठ उपलब्ध झाली.
मंजिरी यांनी आपल्या गोड स्वभावाने बगळूरू मध्ये अनेक जणांशी प्रेमाचे नातं जोडले होतें त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
