संपादक,
सनविवि,
सप्रेम नमस्कार,
अंक वाचला. नेहमीप्रमाणेच अंक, मुखपृष्ठ, सजावट सर्व मनाला भावणारेच आहे. यावेळेस दिवाळीच्या कामांत सर्वच व्यस्त आहेत, त्यामुळे लिहण्या-वाचण्याचे काम थोडे मागे पडलेच. अंक पूर्ण वाचायला वेळ लागला. आपण सुचवलेल्या सर्व विषयांना लेखक मित्रांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. विषयाचा दोन्ही बाजूंनी विचार करून लेख लिहिण्यात थोडी कसरत तर होतीच, पण त्यामुळे सर्व लेखात वैचारिक संतुलन चांगले आहे, दोन्ही बाजूंनी विचार करत सर्वांनी आपला मुद्दा व्यवस्थित मांडला आहे. यावेळी शब्दमर्यादा कमी होती पण सर्व लेखात आशय भरपूर होता.
बहुतेक सर्व लेखातील मुद्दे समान होते. समाईक मुद्द्यांवरच विचार मांडले आहेत. अंक वाचतांना मनात आले, आपल्या सर्वांची विचार करायची पध्दत सारखीच आहे. विचारांची मांडणी, भाषा-रचना, शैली वेगळी वेगळी आहे. आपलेच विचार, आपलेच मुद्दे किती प्रकारे मांडता येऊ शकतात व तेही अधिक प्रभावीपणे, हे लक्षात आले. आपला मुद्दा मांडण्यासाठी प्रत्येकाचे शब्द भांडार दहा बारा पट वाढले असणार. लेखकाच्या स्थानीय भाषेमुळे किती व कसा फरक पडतो, भाषा कशी सम्रुध्द होत जाते हेही लक्षात आले. मजा आली अंक वाचतांना. अजून दोन चार लेख असावेसे वाटत होते. पूर्ण अंक परत एकदा वाचायचा मोह होतो आहे, बघू जमल्यास.
इतक्या छान निरामय वैचारिक चर्चेचा आस्वाद घेण्याची संधी दिवाळीला भेट दिल्याबद्दल सर्व लेखक मित्र व संपादक मंडळाला मनापासून धन्यवाद.
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
डॉ. सौ.अनुराधा भागवत.