सनविवि विनंती विशेष सभागृह सजावट स्पर्धा

सभागृह सजावट स्पर्धा

महाराष्ट्र मंडळ , बेंगळूरू

*गणेशोत्सव २०२२*

या वर्षी गणेशोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे.. *भारतीय*स्वातंत्र्याचा*अमृत*महोत्सव*

सर्व स्थानिक मंडळांना तसेच विविध ग्रुप्सना सुवर्ण संधी ! 

*सभागृह सजावट स्पर्धेत* भाग घ्या आणि खास बक्षीस व मान पटकवा! 

त्यासाठी,भाग घेणाऱ्या संघाने, आपली सजावटींची कल्पना , खालील मुद्दे लक्षात घेऊन मांडावयाची आहे . 

१) आपली कल्पना नेमक्या शब्दांत / चित्रात मांडणे. 

२) सजावटीसाठी लागणारा अंदाजे एकूण खर्च.

३) अंतिम सजावटीसाठी लागणारा वेळ – १ किंवा २ दिवस. 

४) प्रत्यक्ष सजावट, विजेत्या संघाने, गणेश स्थापनेच्या एक दोन दिवसआधी, मंडळात येवून करायची आहे. 

५) पर्यावरणाला पूरक सजावटीचे साहित्य वापरण्यावर भर असावा . सजावट १० दिवस छान टिकणारी हवी . 

६) सजावट स्पर्धेत, आपल्या संघातर्फे,एकूण  किती जणांचा सहभाग असणार आहे याची नोंद असावी . 

७) आपली कल्पना पाठवण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२.

८) इच्छुक संघांना स्पर्धा

नोंदणी लिंक शेअर केली जाईल . 

चला तर मग ! गणरायाची अशा तऱ्हेने सेवा करण्याची संधी सोडू नका! 

गणेशोत्सव समिती २०२२

महाराष्ट्र मंडळ , बेंगळूरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *