महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूच्या सभागृहात रविवार दि. 17 जुलै 2022 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्र मंडळ सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत खालील उपक्रम आयोजित करत आहे.
1. इ श्रम कार्ड – असंघटित कामगार वर्गासाठी उदा. धोबी, स्वयंपाकी, मोलकरीण, रिक्षावाला, भाजीवाला इ.
2. नोव्हेल ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट.
थरमलटिक्स ( Thermalytix ) तंत्रज्ञान वापरून 100 हून अधिक स्त्रियांची चाचणी विनामूल्य करण्यात येणार आहे. ह्या साठी सर्वसाधारणपणे ₹4000/- ते 4500/- इतका खर्च येतो.
3) डॉ. पल्लवी जोशी (MBBS, DPM MD -an eminent neuropsychiatrist) ह्यांचे व्याख्यान.
विषय : मानसिक आरोग्य
वेळ सकाळी 11.30 ते 12.30
या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून कोणाला यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे.
अधिक माहितीसाठी :
दीपक कुलकर्णी : 98451 85655
आरती माहुली : 98801 55312