शब्दाक्षरी

नमस्कार मंडळी 🙏

महाराष्ट्र राज्य विकास अनुमोदीत आणि महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु आयोजित राज्य स्तरीय शब्दाक्षरी स्पर्धेची सुरुवात पाच एप्रिल रोजी झाली, त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे राज्यभरातून झालेली एकूण ३१ संघांची सहभाग नोंदणी !!

बेंगळूरु मधील सोळा संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि आता त्यांच्या सर्व प्राथमिक आणि उपांत्य फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

आता मे महिन्यात बेंगळूरु बाहेरील पंधरा संघांच्या अशा सर्व ऑनलाईन फेऱ्या सुरू होत आहेत …

त्यानंतर रविवार २५ मे रोजी अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारोहाचे आयोजन करण्यात येईल, त्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध लेखिका माधुरी शानबाग ह्या उपस्थित असणार आहेत .

कार्यक्रमाची वेळ आणि इतर माहिती आम्ही कळवतोच.अंतिम फेरीसाठी प्रेक्षक म्हणून आपणा सर्वांना सस्नेह आमंत्रण आहे.

सस्नेह : शब्दाक्षरी कुटुंब

अनुक्रमणिका

1 thought on “शब्दाक्षरी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *