मे महिन्याच्या कोड्याचे उत्तर
आडवे शब्द 1. आनन – मुख , तोंड , 3. मानस – विचार, हेतू , मन , 7. नंद – कृष्णाचा धर्मपिता ,8. लवाजमा – सोबत असणारा परिवार, सेवकांचा ताफा
9. सवा – पूर्ण संख्ये मध्ये तिचा पाव भाग मिळवणे ,10. मीस – ढोंग, निमित्त , सबब ,11. रसग्रहण – एखाद्या साहित्यिक कृतीचा आशय, भावार्थ , सौन्दर्य समजावणे ,13. घसारा – झीज , मूल्यात होणारी घट ,16. हवा – वायू, वातावरणात असते ती ,17. नख – हाता पायांच्या बोटावर असणारे कठीण आवरण
18. सवय – विचार न करता नकळत होणारे वर्तन ,19. मस – चामखीळ , 20. सुकुमार – नाजुक , कोमल , सुंदर ,21. राख – लाकूड जाळल्यावर उरते ती
24. घरटी – प्रत्येक घरागणिक ,25. सक्षम – समर्थ, 27. नाक – एक ज्ञानेंद्रिय ,28. रात – निशा , रजनी ,30. मरगळ – थकवा , सुस्ती ,31. दाद – न्याय , कौतुकाची पावती ,33. तागा – अखंड न फाडलेले कापड ,34. अननस – एक फळ ,35. डामडौल – थाटमाट , सरंजाम
उभे शब्द : 1. आनंदघन – लता मंगेशकर या नावाने संगीत रचना करत होत्या ,2. नद – मोठी नदी , 3. मावा – खवा ,4. नजर – दृष्टि , धोरण ,5. समास – दोन किंवा अधिक शब्द जोडून तयार केलेला एक शब्द ,6. दिवाण – जुन्या काळातील मंत्री , उच्च पदस्थ , 8. लस – रोग प्रतिबंधक पदार्थ ,9. सहवास – एकत्र राहणे
10. मीरा – एक संत , कृष्णाची परम भक्त , 12. ग्रहमख – विवाहपूर्व केलेली नवग्रह शांती , 14. साखसुरत – प्रमाणशीर, नीटनेटके ,15. नवरस – मानवी मनाच्या नऊ मूलभूत भावना ,18. समा- गायनानंद , समुद्राच्या पूर्ण भरतीची वेळ ,21. कुटी – झोपडी , 22. रामरगाडा – कामांची अतिशय गर्दी , 23. काक – कावळा , 24. घराणे – कुल , वंश , 26. क्षमता – योग्यता , ताकद , 27. नाळ – बाळ जन्माला आल्यावर हि कापली जाते ,29. सदन – घर , 31- दान – देणगी
33. कल – ओढा , रुची
सतीश बर्वे
