स्वर दीपावली
महाराष्ट्र मंडळात स्वर दीपावली कार्यक्रम होणार आहे हे समजले आणि खूप आनंद झाला .आज कार्यक्रमाला उपस्थित रहायला मिळाले आणि आनंद द्विगुणित झाला.
मंडळाच्या सभागृहात प्रवेश केला आणि अतिशय छान वातावरण अनुभवायला मिळालं, कारण दिवाळीची थीम घेऊन केलेली सजावट फारच सुंदर होती , लाईट ईफेक्टमुळे सभागृहात पहाटच वाटत होती. दिपक कुलकर्णींनी गायकांच्या परिचयाने कार्यक्रमाला सुरुवात केली. बेंगळूरु येथील गायक असूनही कधी श्रुती भिडे आणि अनिकेत प्रभू यांचे गायन ऐकण्याचा योग आला नव्हता.
दोन्ही गायकांनी नेहमी मराठी गाणी गायची सवय नसतानाही सर्वच गाणी अप्रतिम गायली. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांतील गाण्यांची निवड खूपच छान होती . 😊👌👌
कार्यक्रम खूपच रंगला. याला दिपकजींची खास जोड मिळत होती. त्यांनी निवेदनाची नेहमीची धाटणी न ठेवता गाणी तयार होतानाच्या आठवणींना उजाळा दिला. श्री. अजित आणि मंजिरी एदलाबादकर यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला होता. रसिक श्रोत्यांना मंडळात त्याचा आनंद घेता आला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. 😊🙏🙏
सरतेशेवटी मंडळाकडून छानसा दिवाळी फराळ आणि चहा,कॅाफी दिली होती.
एकंदर संपूर्ण कार्यक्रम अविस्मरणीय झाला.
मंडळ कमिटीचे धन्यवाद. 😊🙏🙏
–पूजा तांबे.

