सनविवि श्रध्दांजली श्रद्धांजली – सुरेश कर्जतकर

श्रद्धांजली – सुरेश कर्जतकर

— …सौ. विद्या पाध्ये —

महाराष्ट्र मंडळाचे आजीव सभासद श्री. सुरेश श्रीधर कर्जतकर यांचे 22 मार्च रोजी निधन झाले; त्यांना सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

व्यवसायाने आर्किटेक्ट असलेले श्री. कर्जतकर एक बोलक्या स्वभावाची  हसतमुख व्यक्ती म्हणून मित्र परिवारात प्रसिद्ध होते. महाराष्ट्र मंडळावरच्या प्रेमाखातर सर्व कार्यक्रमांना ते आवर्जून सपत्नीक हजेरी लावत असत. मंडळाच्या लिफ्ट बसवण्यासारख्या काही उपक्रमासाठी त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे. ह्याखेरीज लायन्स क्लब ह्या समाजसेवी संस्थेच्या कार्यामध्ये त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. 

श्री. सुरेश व रेणू कर्जतकर यांनी artificial limbs सारखा प्रोजेक्ट असो किंवा एखादे गाव दत्तक घ्यायचा विचार असो , अशा कार्यात आपला सिंहाचा वाटा उचलला आहे. 

गोर गरिबांना अन्न दान,तसेच गरजेनुसार छत्र्या,स्वेटर, ब्लँकेट्स इत्यादींचे ते वाटप करीत असत.

आमचे आणि कर्जतकर कुटुंबाचे स्नेहसंबंध खूप जुने. श्री.सुरेश यांना गाणी ऐकायची आणि प्रवासाची प्रचंड आवड होती. त्यांच्यासोबत केलेला देश-विदेश प्रवास आमच्या नेहमीच आठवणीत राहील. एका अतिशय जवळच्या स्नेह्याचे असे आमच्यातून निघून जाणे आमच्या जीवाला चटका लावून गेले. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगातून बाहेर पडण्याची ताकद मिळू दे हीच प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *