Abhipray रसिका राजीव हिंगे

किती भराभर दिवस, महिने पुढे गेले. वर्ष संपायला आले. बारा महिने बारा लेख लिहिता लिहिता कधी बारा महिने पूर्ण झाले कळलेच नाही. दर महिन्याला साधारण 8 ते 10 तारखेच्या दरम्यान येणारे सनविवि वाचून झाल्यावर वेगळाच आनंद मिळत होता. स्वतःचा लेख असलेले मासिक पाहून मूठभर मांस चढत होते अंगावर.

नवनवीन लेखक, प्रत्यक्ष ओळख नसूनही लेखणीच्या साहाय्याने जोडले गेले. प्रत्यक्ष नजरानजर नसली तरी लेखणी एकमेकांशी बोलत होतीच. यावेळी बारावा लेख पाठवताना अशाच संमिश्र भावना मनात होत्या. स्पर्धेत सहभाग आहे हीच माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी होती.

सगळ्यांची लेखणी, भाषा परिचयाची झाली. अभ्यासपूर्ण लेख लिहिणारे लेखक लेखिका यांचे वाचक व्हायला खूप आवडले. मला बरेच काही मिळाले.

पालकांचे पाल्यांशी कसे संबंध असावे हा विषय तर आजच्या परिस्थितीवर फारच उपयोगी असाच होता.  भाषाशैली वेगळी, लिहिण्याचा बाज वेगळा, विचार वेगळे, भाषेवर असलेले प्रभुत्व वेगळे त्यामुळे एकापेक्षा एक सरस लेख वाचले अन्  मला माझी जागा सापडली.

इथपर्यंत पोहचण्यासाठी सनविविने बोट धरले म्हणून या क्षेत्रात म्हणजे वैचारिक लेख वगैरे साठी पाऊल पडले ही फार मोठी मिळकत आहे.

अशीच उत्तरोत्तर सनविविची प्रगती होत राहो. सनविविच्या सर्व टीमचे मन:पूर्वक आभार.

डिसेंबर 2022चा अभिप्राय लिहिताना मन असेच भरून येणार आहे.

 

रसिका राजीव हिंगे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *