अभिप्राय : वाद्य पूजन

वाद्य पूजन

मला ” वाद्य पूजन” ही संकल्पनाच खूप आवडली. पुढची पिढी संस्कारक्षम आहे याचं हे प्रतीक आहे. ज्या काळात अशा गोष्टी आठवणीने विसरल्या जातात त्या काळात ही पिढी संस्कार जोपासत आहे याचा अभिमान वाटतो.

कार्यक्रम सुंदर झाला. व्यासपीठावर केलेली ढोलांची मांडणी, त्याखाली ठेवलेले ताशे , एवढ्या सगळ्यांमध्ये छान बसवलेले झांज, खाली छत्रपतींची  मूर्ती, राजमुदा हे सगळच देखणं होतं.

महानाद चमूचा उत्साह,शिकण्याची जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी कौतुकास्पद आहे. त्यांना लाभलेले हर्षद, पूजा, अपर्णा, सुचेता, आणि इतरांचे मार्गदर्शन, त्यांनी लावलेली शिस्त आणि त्याचा प्रत्यय येत होता. सर्वांचे मनोगत आपलेपणा दाखवणारे होते. मंडळाशी त्यांना नकळत बांधून घेतलं आहे हे दिसत होतं.

परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा संगम ” महानाद” खूप छान बांधते आहे हे मनापासून आवडले.

एकंदरीत सगळाच कार्यक्रम नेटका, सुटसुटीत आणि सुंदर झाला.

पुन्हा एकदा संपूर्ण “महानाद” चमूचे अभिनंदन, कौतुक आणि पुढील सर्व कार्यक्रमासाठी शुभेच्छा.

दीपक कुलकर्णी

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *