आगामी कार्यक्रम

अभिवाचन कार्यशाळा

मार्च महिन्यात घेतलेल्या अभिवाचन कार्यक्रमास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महाराष्ट्र मंडळाने एक दिवसीय अभिवाचन कार्यशाळा आयोजित केली आहे.

आपल्या सकस अभिनयामुळे रसिकांना सुपरिचित असलेले श्री. विघ्नेश जोशी कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.

एखादी साहित्यकृती अधिक प्रभावी पद्धतीने कशी वाचावी याचे शास्त्रशुद्ध तंत्र आत्मसात करण्यासाठी लवकरात लवकर सोबत दिलेला गूगल फॉर्म आणि फी भरून आपली उपस्थिती निश्चित करा.

सर्वांच्या सोयीसाठी आणि जास्तीत जास्त सहभागासाठी ही एक दिवसीय कार्यशाळा आपण दिनांक 13 जून आणि 14 जून 2026 अशी दोन वेळा आयोजित करत आहोत.

कृपया तुम्हाला सोयीस्कर असणाऱ्या अशा एकाच तारखेचा पर्याय फॉर्ममध्ये निवडावा.
https://forms.gle/udv6aFm5ndJ54HGA6

कार्यशाळेसाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

फी –
सभासदांना रु. 1200/-*
सभासदेतर. रु. 1500/*

( चहा /कॉफी आणि जेवण यासहित शुल्क आहे.)

गूगल फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 मे 2026

कार्यशाळेची फी भरण्यासाठी
संपर्क :
स्मिता बर्वे : 7829901762
राधिका मराठे : 94483 05067

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *