सनविवि आगामी कार्यक्रम,इ स न वि वि जून -जुलै २०२६ आगामी कार्यक्रम: स न वि वि गणेशोत्सव विशेषांक अभिवाचन स्पर्धा २०२६

आगामी कार्यक्रम: स न वि वि गणेशोत्सव विशेषांक अभिवाचन स्पर्धा २०२६

स न वि वि गणेशोत्सव विशेषांक अभिवाचन स्पर्धा २०२६

महाराष्ट्र मंडळाने ह्या वर्षी अभिवाचन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ३० ऑगस्ट २०२६ रोजी मंडळाच्या सभागृहात होईल.

वैयक्तिक आणि सांघिक सादरीकरण असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. फक्त गद्य साहित्य (स्वलिखित चालणार आहे) वाचायचे आहे. गूगल फॉर्म भरणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम तारीख आहे याची कृपया नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा-  स्मिता बर्वे.   7829901762 ,    राधिका मराठे.  9448305067

कथा स्पर्धा नियम

 १. कथा मराठी भाषेत आणि ७५० ते १००० शब्दांत असावी. दिलेल्या चित्रांपैकी एक चित्र निवडून कथा लिहावी.

  २. लिखाण स्वलिखित असावे. अनुवादित आणि पूर्वप्रकाशित (छापील किंवा डिजिटल) नको. कृपया निकाल हाती येईपर्यंत लिखाण प्रसिद्ध करू नका.

 ३. एक स्पर्धक एकच एन्ट्री.

 ४. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

 ५. सभासदांसाठी विनामूल्य आणि इतरांना ₹ १५०/- स्पर्धा प्रवेश फी. गूगल फॉर्म भरणे आवश्यक.

  ६. दिनांक १ ऑगस्ट २०२६ पर्यंत एन्ट्री इ मेल करावी. इ मेल आय डी- snvv.mmbangalore@gmail.com  मेलच्या subject मध्ये गणेशोत्सव स्पर्धा असे लिहावे.

७. गूगल डॉक्स किंवा वर्ड फॉरमॅट मध्येच लिखाण करावे. PDF किंवा फोटो  नको.

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *