महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु आयोजित करत आहे , गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या गानकलेची झलक दाखवणारी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची मैफिल, ”सहेला रे”

सादरकर्ते:
राधिका जोशी (पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या ), अभिषेक काळे ( पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे शिष्य )
१० मे – शनिवार, संध्याकाळी ६ ते ८ , महाराष्ट्र मंडळ, गांधीनगर
आपणा सर्वांना अगत्याचे निमंत्रण 🙏
“सहेला रे”
गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले दोन अग्रणी! दोघे दोन वेगळ्या घराण्यांचे पण त्यांचे संगीत त्यांच्या घराण्यापुरते मर्यादित राहिले नव्हते. या दोघांनीही सामान्यजनांना शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली, गोडी लावली असं म्हणलं तर ते चूक ठरणार नाही.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील या दोन समांतर रेषा मोठे अवकाश व्यापतात याच जाणीवेतून या दोघांच्या संगीताची झलक दाखवणाऱ्या “सहेला रे” या कार्यक्रमाची कल्पना सुचली.
सादरकर्ते राधिका जोशी आणि अभिषेक काळे या कार्यक्रमात या किशोरी ताई आणि भीमसेन जोशी यांनी गायलेल्या बंदिशी, अभंग, भजने, भावगीते, गज़ल, नाट्यगीते अशा सुगम, उपशास्त्रीय संगीताचे सादरीकरण करतील. किशोरी अमोणकरांच्या तालमीत तयार झालेल्या पं. रघुनंदन पणशीकर यांच्याकडे राधिका जोशी गेली 18 वर्ष संगीत शिकत आहे. तर किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे अभिषेक काळे गाणे शिकत आहे.
RSVP Link: https://forms.gle/xQnvRC6fRqPgLNvS7/
