महाराष्ट्र मंडळ, बेंगळुरू तर्फे सर्व कलाकारांना एक सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे.
बेंगळुरूमधील कलाकार महाराष्ट्र मंडळ, गांधीनगर येथे 15th ऑगस्ट 2022 रोजी आयोजिलेल्या प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्या कलाकृती रसिकांसमोर आणू शकता.
या उपक्रमाचे उद्दिष्ट तुमच्या हस्तकलांची ओळख इतरांना करून देणे आणि कलाविष्काराला प्रोत्साहन देणे हे आहे. त्यामुळे प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या सर्व वस्तू तुम्ही स्वतः बनवलेल्या असाव्यात.
आलेल्या कलाकृतींपैकी उत्कृष्ट कलाकृती निवडून कलाकारांना पारितोषिके देण्यात येईल.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
महाराष्ट्र मंडळाच्या सर्व सदस्यांसाठी प्रवेश शुल्क रुपये 200/- व सभासदेतर प्रवेश शुल्क रुपये 500 /- राहील.
प्रत्येक सहभागी कलाकार जास्तीत जास्त 3 कलाकृती ठेवू शकतो. या साठी 3 गट करण्यात आले आहेत.
नाव नोंदणी करताना कोणत्या गटात सहभागी होणार ते नमूद करावे.
- टाकाऊतून टिकाऊ
- सुई धागा
- पेंट ब्रश
एक स्पर्धक तिन्ही गटात सहभागी होऊ शकतो, पण जास्तीतजास्त तीन कलाकृती ठेवू शकतो.
नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 15th July 2022.
पूर्व नोंदणी करणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
वैशाली तोरवी – 9945282646
उर्मिला जाधव – 9880052860
सरोज कलंत्रे – 9819322924
