सनविवि ललित,साहित्योन्मेष भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे महत्वाचे?

भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे महत्वाचे?

 —– मानसी तांबेकर  —–  

       परवा  माझ्या दहा वर्षाच्या लेकीसोबतनॅशनल जिओग्राफ़ी’ हे चॅनेल पाहत होते. आवाजाच्या, वासांच्या आधारे प्राणीजगतातील शिकारी आणि शिकार कसा  वेध घेतात हा विषय होता. त्यात  वाघ जवळपास आल्याचा संदेश  माकडांनी चित्कारुन दिला आणि सर्व माकडे सावधान झाली . हे  पाहून माझ्या चिमुकलीने म्हटलेआई , यांना किती छान ! Without any language they can communicate. नाहीतर आम्हीवेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतातम्हणजे हेच बघशाळेत इंग्रजी, हिंदी , फ्रेंच, तुझ्याशी मराठीबाबाशी कधी तमिळ, कधी इंग्लिश तर  पाळणाघरात कन्नड. वर सर्वजण भाषा  ‘शुद्धअसावी म्हणून टोकत राहणार. पण मला वाटतं शुद्ध भाषेपेक्षा मला माझ्या मनातले विचार माझ्या भाषेत सांगता येणे Important आहे नाही का ?’ एवढ्यात तिच्या मैत्रिणींनी तिला हाक मारली आणि माझी लेक खेळायला निघून गेली. पण हा प्रश्न सोडून गेली की भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे महत्वाचे?

       माणसाने पाळलेले अनेक प्राणी आपल्या मालकाच्या बोली सूचना ऐकून त्या पाळतात. पाळीव कुत्री, मांजरे, गाई, म्हशी, बकऱ्या आपला राग, आनंद, भीती आवाजाद्वारे व्यक्त करतात. हे आवाज आणि शारीरिक हालचाली, हावभाव हे कायिक आणि वाचिक भाषेचे आविष्कारच आहेत. लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते कुठलीही भाषा शिकलेलं नसतं पण तरी त्याच्या हावभावातून आपण त्याच्याशी गुजगोष्टी करत असतो. याच गुजगोष्टींना संवादाचे रूप देण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो. भाषेच्या द्वारे आपण आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार व्यक्त करू शकतो. मूळ संस्कृत भाषेतीलभाष्’ या धातूवरून तयार झालेला तत्सम शब्दभाषा’ –म्हणजे बोलणे. या पलीकडे जाऊन आपण त्याला व्यापक रूप दिले एकमेकांशी संवाद साधून. तसे पाहता संवाद साधण्यासाठी लिहिणे, वाचणे, बोलणे, इशारे, हावभाव, मुक अभिनय, मुद्राभाव अशी अनेक साधने आहेत परंतु भाषा हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. पंधरा वर्षांपूर्वी एका आदिवासी शाळेत शिकवतांना मला एक अनुभव आला तो असातिथे शिकवतांना आम्हा शिक्षकांची, पाठ्यपुस्तकांची भाषा आणि त्या मुलांची भाषा यात मोठे अंतर होते .लाजरीबुजरी मुलं ,त्यांच्या आर्थिक अडचणी;  त्यामुळे त्यांची  ‘मन की बातती कधीच बोलून दाखवत नव्हती. पण मग आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्यासाठीजेवण केले का?’ ऐवजीरोटी टींट्यांव,’इकडे येऐवजीएक्कडदाअशी त्यांची भाषा आत्मसात केली. प्रमाण भाषेतले आमचे मराठी आणि त्यांची भाषा यामुळे वर्गात कधीकधी हसा पिकायचा. आम्ही जेव्हा मुलांच्या भाषेला स्वीकारले तेव्हा  मुलांनी आम्हाला आणि शाळेला स्वीकारले! त्यानंतरसांग मा पाखरां मारीत न्हाईझाडा तोडीत न्हाई’  असे आपल्या निबंधात लिहिणारामंग्या’  त्याला पर्यावरणाबाबत असलेले  भान सांगून गेला आणि माझ्या कायम स्मरणात राहिला कारण त्याने त्याच्या भाषेत त्याच्या भावनांना शब्दरूप दिले होते व संवाद साधला होता.

            भाषा प्रवाही आहे. ती सभोवतालचे रंगढंग उचलत पुढे वाहत असते. माणसाच्या भाषेवर त्यात्या प्रदेशाचे आणि तेथील वातावरणाचे संस्कार होत असतात. त्यातून वेगवेगळ्या जाति-धर्माच्या भाषा,अनेक बोली भाषा यांची निर्मिती होते. प्रत्येक प्रदेशानुसार जरी बोलीभाषेचे स्वरूप असे बदलत असले तरी व्यवहाराच्या भाषेत समानता असणे ,एकसूत्रता असणे  गरजेचे आहे. म्हणूनच भाषेच्या ‘शुचिते’ला ही तितकेच महत्त्व आहे. भाषा कुठचीही असो, जर आपण त्याचे व्याकरण अथवा नियम याचा अभ्यास करून जर ती भाषा आत्मसात केली तर संवाद साधणे सोपे होते.अलंकार,उपमा, म्हणी , वाक्प्रचार यांच्या वापरातून आपण आपली भाषा शैली विकसित करत असतो. योग्य शब्दांचा वापर व उच्चारण न करणे , शुद्धलेखनाच्या चुका, विरामचिन्हांचा अयोग्य प्रयोग  यामुळे  संवाद साधतांना कधी समोरचा माणूस दुखावला जाऊ शकतो तर कधी विनोदनिर्मिती होते. उदाहरणार्थ   ‘मी चोरी करणार नाही. केली तर शिक्षा कराआता या वाक्यात जर पूर्णविरामनाहीशब्दाच्या अगोदर पडला तर अर्थाचा विपर्यास होतो. त्याचप्रमाणे  रस्ता   मार्ग हे शब्द समानार्थक जरी असले तरी त्यात खोल अर्थ दडला आहे. तो असा कीजो कसाही जाऊ शकतो तो रस्ताआणि जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग. प्रभावी संवाद साधतांना नेमके या  आणि अशा गोष्टींचे भान ठेवणे महत्वाचे आहे आणि म्हणूनच भाषेची शुचिताही महत्वाची  म्हणजेच भाषेच्या संस्कृतीला जपणे गरजेचे आहे. शुचितेचाअट्टाहास करता त्याचा ‘ध्यास’ `धरून जर आपण भाषा जपली तर आपण आपली संस्कृती जपल्यासारखे आहे कारण ‘भाषेची अभिवृद्धी हा देशाचा उत्कर्ष.’

           कोणत्याही भाषेत ग्रामीणत्व, अशुद्ध, अश्लीलता असे काहीही नसतेशहरी माणसाच्या दृष्टिकोनातून एखादा शब्द ग्राम्य वा अश्लील ठरत असेल तर ग्रामीण लोकांच्या दृष्टिकोनातून तो दैनंदिन नैसर्गिक व्यवहार ठरू शकतोभाषेतील ह्या संकल्पना व्यक्तीसापेक्ष आहेत असे मला वाटते. भाषेमुळेच सामाजिक आंतरक्रिया चालू राहते, माणसाची एकमेकांशी ओळख होते संवाद सुरू होतो. मूकबधिर लोकही संवाद साधतात त्यांच्या भाषेतून. तेव्हा भाषा ही माणसं जोडण्यासाठी आहे तोडण्यासाठी नाही. आपल्या भाषा प्रेमाने वा शुचितेच्या हट्टापायी जर माणसं तुटत असतील तर आपण आपल्या भाषेवर आंधळं प्रेम करतो, असं म्हणावं लागेल. भाषा आणि संवाद याचा मेळ कसा साधावा यावरनेल्सन मंडेला’ म्हणतात

If you talk to a man in a language, he understands that goes to his head, if you talk to him in his language that goes to his heart.’

                                                       

मानसी तांबेकर

9980700711

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *