संवाद

सप्रेम नमस्कार,

अगदी सहज म्हणून फेब्रुवारी महिन्यात कोणते विशेष दिन साजरे केले जातात याची गुगलवर तपासणी करून पाहिली आणि अशी तेरा दिवसांची मोठी यादीच समोर आली. 

त्यातील २७ फेब्रुवारी हा मराठी भाषेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस!  जेष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर म्हणजेच आपले कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. एका दृष्टीने मराठी भाषेचा आणि साहित्याचा हा सन्मानच आहे.

       मात्र सर्वांच्या सोयीसाठी रविवार दिनांक १ मार्च रोजी महाराष्ट्र मंडळाच्या सभागृहात मराठी भाषा गौरव दिनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

या कार्यक्रमात ‘हक्काचा कलामंच‘ ह्या उपक्रमांतर्गत अभिवाचनाचा कार्यक्रम होईल. तुम्हाला तुमच्या आवडत्या कथा किंवा कवितांचे वाचन करता येईल. वैयक्तिक किंवा सांघिक सादरीकरण अपेक्षित आहे. रसिकांसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी असेल.

       आमच्या विशेष लेख स्पर्धेचा निकाल १ मार्च रोजी जाहीर होईल. आम्हाला देखील निकालाची उत्सुकता आहे.  किती स्पर्धक होते, कुठून कुठून एन्ट्री आल्या याविषयी जाणून घ्यायला  १ मार्च रोजी महाराष्ट्र मंडळात नक्की या. आम्ही वाट पाहत आहोत. कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मीडियावर तसेच ह्या अंकात देखील दिले आहेच. मोठ्या संख्येने सर्वांची उपस्थिती अपेक्षित आहे.

       २६ जानेवारीला महाराष्ट्र मंडळात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. श्री.उदय पळनिटकरांनी

‘बलसागर भारत होवो’ ह्या गीताचे उत्स्फूर्त सादरीकरण केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्य पाहुण्या म्हणून लाभलेल्या Spastics Society of Karnataka च्या श्रीमती शोभा सुंदर यांनी आपल्या भाषणातून spastic व्यक्तींना येणाऱ्या विविध समस्या आणि त्यांचे समाधान याबद्दल आपले विचार मांडले. कार्यक्रम आवडल्याचे उपस्थितांनी आवर्जून सांगितले. युथ फॉर सेवा यांना विश्वस्त मंडळाने तर Spastic society ला महाराष्ट्र मंडळाने मदतीचा हात पुढे करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.

असाच एक ऋणानुबंध  स न वि वि आणि वाचकांचा आहे. मंडळाचे हे मुखपत्र आपल्या सर्वांचे आहे. तुम्हाला नवीन स्वरूपातील स न वि वि कसे वाटला?  सदरांविषयी तुमच्या अपेक्षा काय, कुठली पुस्तके वाचावीशी वाटतात, कुठले कार्यक्रम बेंगळूरुमध्ये यावे अशी अपेक्षा आहे… यांसारख्या अनेकविध प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत्या करण्यासाठी आज…आत्ता…लगेच व्यक्त व्हा.  इमेल आयडी दिला आहेच.

कळावे, लोभ असावा. 

राधिका मराठे 

स न वि वि

संपादक मंडळ

२६ जानेवारीच्या कार्यक्रमाची क्षणचित्रे

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *