नमस्कार मंडळी,
आपल्या घरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना आपण मंडळात आयोजित केलेल्या कार्यक्रमांना देखील आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि आपल्याला मंडळाचे कार्यक्रम आवडले आहेत हे समजत आहे.
आपल्या स न वि वि चा गणेशोत्सव विशेषांक स न वि वि च्या वेब साईट वर लवकरच अपलोड करण्यात येत आहे , आपण तो पुन्हा डिजिटल स्वरूपात वाचाल अशी आम्हाला खात्रीच आहे .
ह्या अंकात , आपल्याला मंडळात आयोजित केलेल्या आगामी कार्यक्रमांची माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे “नांदी संमेलन ” महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुत दिनांक ६ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.ह्या अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाचे तपशील आपल्याला मंडळाच्या सर्व व्हॉट्सॲप गृपवर मिळतील.
याचबरोबर आपण सालाबादाप्रमाणे किल्ले स्पर्धा आयोजित करत आहोत . त्याची अधिक माहिती आपल्याला ह्या अंकात वाचता येईल.
दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ला आपण “स्वर दीपावली ” , हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे , त्याची माहिती आपल्याला ह्या अंकात तसेच मंडळाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम हँडलवर वाचायला मिळेलच.
मंडळी, महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु विविध कार्यक्रम आयोजित करत असते, ते अधिकाधिक चांगले व्हावे याकरता आपले सहकार्य आम्हाला हवे आहे. आपल्या सभासदत्वाचे नूतनीकरण आणि अजून नवीन सभासद नोंदणी आम्हाला हवी आहे . आपण आपल्या मित्रपरिवारात मंडळ आणि सभासदत्वाविषयी नक्की सांगा.
कळावे
लोभ आहेच
इ स न वि वि संपादक मंडळ

1 thought on “संवाद”