सनविवि इ स न वि वि - ऑक्टोबर २०२४,कथा २०२४ गणेशोत्सव स्पर्धेतील कथा

२०२४ गणेशोत्सव स्पर्धेतील कथा

२०२४ गणेशोत्सव स्पर्धेतील कथा

“लिमिटेड एडिशन “
नऊ पन्नास च्या लोकल साठी धावता धावता मिलिंदला धाप लागली होती आणि अशा घाईच्या वेळेत फोन वाजला, चेहऱ्यावर स्पष्ट ताण, राग ,घाई दिसत होती त्याच्या, पण तरी का कोण जाणे त्याला तो फोन घ्यावासा वाटला. समोरून रोहित बोलला ‘अरे मराठे बाई गेल्या’ -ं‘काय ? बस एवढंच मिलिंद म्हणालाआणि काही बोलायचे त्याला सुचेचना. तिकडून रोहित सांगत होता सविस्तर ,पण मिलिंद चालत राहिला. 9.50 चुकली आणि मिलिंद ला पण आपण कुठे तरी चुकलो हे प्रकर्षाने जाणवले पण वेळ निघून गेली होती. ‘मराठे बाई’ आपल्या शाळेतील दहा वर्षां पैकी 5 वर्ष सातत्याने त्यांच्या हाताखाली तयार – झालेली ही मुलं, मुली आज त्यांच्या अंत्य दर्शनासाठी जेंव्हा जमली तेव्हा आज सुद्दा बाई उठून आपल्याला मायेने चार प्रेमाचे चार शब्द सांगतील आणि त्यातूनच शिक्षण देतील असे सगळयांना वाटले होते. मिलिंद, रोहित, धनश्री, भूषण सगळेच आता पन्नाशीत ,पण शाळेतील ती बाकं, फळा, खडू जणू आत्ता समोर आहेत आणि ते संपूर्ण जीवन आपण पुन्हा जगतोय असे वाटत होते सगळयांना. ‘‘वो दिन ही कुछ और थे’ स्पर्धा होती रे घरात.सुबत्ता म्हणशील तर बेताचीच पण दिल अमीर था’’ – रोहित ने वातावरणातील ताण थोडा कमी केला. ‘‘अरे – तुला खोटं वाटेल पण आज पुण्यात असताना कोणाचा तरी नंबर शोधताना मला मराठे बाईंचा नंबर दिसला, अगदी मनात आलं फोन करावा पण राहूनच गेलं – ते कायमचचं.’’ धनश्रीने डोळे टिपले. ‘‘बाई एवढ्या आजारी असतील असं वाटलचं नाही रे, त्या नेहमी म्हणायच्या ‘ये एकदा भेटायला’ – आणि मी हो म्हणून कधीच वेळ कधी काढू नाही शकलो – ये ये म्हणता म्हणता इतक्या लांब गेल्या आणि मनात माझ्या शल्य कायमचं राहून गेल ’’ं – मिलिंद अपराध्या सारखा म्हणला- तेवढ्यात दारातून जोशी मॅडम नातवाचा हात धरून आत आल्या – अंत्य दर्षनासाठी हात जोडला आणि षांत उभ्या राहून एकटक बाईंच्या निष्चल देहाकडे बघत राहिल्या – डोळे भरून आले त्यांचे आणि आमचेही – कितीही वयस्क – असल्या तरी आपले शिक्षक आपल्याला घडवणारे जणू कुंभार हे जाणणारी आमची पिढी. पाठोपाठ भागवते मॅडम आणि बर्वे बाई आल्या. इतका संयम या सगळयांच्या वागण्यात – षाळेतील षिस्त त्यांनी इथेही बाळगली – एकाच वयातील आपली सखी जिच्याबरोबर 20- वर्शांचा काळ षाळेच्या स्टाफरूम मध्ये आपण घालवला त्याची छबी प्रत्येकीच्या डोळयात दिसत होती. आम्ही सुद्धा गणवेषातील मुलं होऊन तो काळ मनात जगत होतो- वर्गातील मस्ती शिकवणाऱ्या बाईंचा आवाज, घंटा वाजवणारे षिंदे, पाण्यासाठी कुलर जवळील रांग , प्रार्थना चालू असताना दिलेली जांभई, लपून छपून खाल्लेला डबा,पाठांतर न – झाल्यामुळे पडलेले धपाटे, दहावीच्या परीक्षे आधी मुख्याध्यापक बाईंचे भाषण, समिश्र भावना असलेले सभगृह आणि पाया पडताना या सगळया षिक्षिकांचा मायेचा आर्षीवाद- आम्ही घडवलेली, दहावर्शे- बरोबर असणारी पाखरं उडून जाणार , हा आनंद प्रत्येकीच्या डोळयात जाणवत होता. हा संपूर्ण काळ प्रत्येक जण त्या क्षणी जगत होत्या मुलं षाळेबाहेर आत्मविष्वासाने जात आहोत हा मोठा आनंद. रात्र – झाली मिलिंद ला आज झोप लागतंच नव्हती, डोळयासमोर मराठे बाई सारख्या येऊन उभ्या राहायच्या. किती वेळा त्यांनी बोलावले पण येन केन कारणाने ते राहिलेच. बाईंना आज बघून वाटलं असं खरच त्यांना बघवलं नसतं. त्यांची माझ्या डोळयातील प्रतिमाच वेगळी होती दृ,अस्खलित पाठांतर असणाऱ्या वाई, – पार्किन्सन्स ग्रस्त झाल्या आणि षेवटी तर नीट बोलता पण यायचं नाही त्यांना- संस्कृत सुभाशित त्यांच्या तोंडून ऐकताना खूप छान वाटायची आणि जाताना एक साधा षब्द उच्चारणं त्यांना जड जात असे कळलं – बरं – झालं त्यांची ती छवि मी नाही बघितली पण मग मिलिंदच्या डोक्यात विचार आला, मला बघून त्यांना किती आनंद – झाला असता असा मी विचारच नाही केला – असे आणि अनेक विचार करत डोळा लागणार एवढ्यात फोन वाजला – इंटरनॅशनल कॉल वाजला – जरा बुचकळयात पडला मिलिंद घेऊ की नको – पण मग घेतला – समोरून – येणारा आवाज तसा वयस्करच वाटला-ं मिलिंद बोलतं होता – हॅलो – हॅलो – ‘‘हॅलो , मी कॅलिफोर्नियामधून रानडे बोलतोय – मिलिंद पिंगळे का ’’- ‘‘ हो, बोला ’’ इति मिलिंद अरे मी मोहन रानडे , आज तुझ्या ऑफिसमधील बॉस नार्वेकर यांच्याषी बोलत असताना काही कारणाने तुझा विषय निघाला , पिंगळे आडनाव ऐकलं आणि फोन घेतला तुझ्या साहेबांकडून –जरा उशीर झालाय भारतात पण मनात एक शंका होती म्हणून घाईने फोन केला – हुजुरपागेतील पिंगळेसर तुझे कोणी होते का- भो. र.पिंगळे ‘‘आजोबा – आजोबा होते ते माझे’’ , इतक्या वर्शानंतर आजोबांची आठवण कुणी परदेषस्थित भारतीय का बरं काढत असेल – मी विचार करत असतानाच तिकडून रानडेंचा कापरा आवाज कानावर आला – सर होते ते माझे -आज बर्याच काळानंतर आमचा 1960 च्या ग्रुपवर आमचे शिक्षक हा विशय चर्चेचा होता आणि बोलता बोलता सरांची आठवण, शिकवणं, शिस्त , मितभाशी स्वभाव , विशय शिकवतानाचा धीरगंभीर आवाज सगळच आम्हाला आठवलं आणि त्यानंतरच योगायोगाने तुझे बॉस माझे स्नेही हे तुझ्या बद्दल माझ्याषी बोलले तुझ्या नवीन प्रोजेक्ट बद्दल बोलत असताना आडनाव ऐकलं आणि मनात पिंगळे सरांचे चित्र उभे राहिल -पण खरचं खूप वरं वाटतं आहे सरांच्या नातवाषी बोलताना – जणू त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या – असे शिक्षक पुन्हा होणे नाही – बरं तुझ्या कडे सरांचा फोटो असल्यास नक्की पाठव – या गुरूपौर्णिमेला त्यांच्या फोटोलाच नमस्कार करीन -असो उशिरा अचानक फोन केला – क्षमस्व -राहवले नाही, तरी सरांचा नातु आहेस नक्कीच चिडणार नाहीस – Good night नंबर सेव करून ठेव आणि फोटो तेवढा पाठव -धन्यवाद – आणि पुन्हा एकदा साॅरी ’’ मी हसुन ‘नक्की’ म्हंटलं आणि तंत्रज्ञानाने जोडलेली ही नवी नाती कशी जुन्या जुळलेल्या तारांवरचं टिकन आहेत याचे आश्चर्य वाटले – आणि आनंदही. बाई, शाळा , रानडेकाका माझे आजोबा हे विचार घेऊनच मिलिंद झोपला आणि सकाळ कधी झाली ते कळलेच नाही. नाष्त्याला सुषीला बोलवत होती आणि निथे जवळचं लेक सकाळी सकाळी Chat GPT का काय ते उघडून बसली हाती – इयत्ता आठवी – शाळेतील project Chat GPT वापरून पूर्ण करणे सुरू होते – बाबा-‘‘यु नो धिस अॅप इज सूपर्ब’-सगळं माहित आहे याला – चुटकीसरषी माहिती. आता शाळेत गेलं काय आणि नाही काय knowledge मिळणारच, शीवाय अकरावीत तर मी integrated करणार – काॅलेजला जायला नको -mobile , Google , Chat GPT सर्व काही पुरेल अभ्यासाला. सगळया विशयांचे detailed व्हिडियो आहेत ते सुद्धा फुकट – आहे की नाही गंमत – नवीन पिढीचे नवीन शिक्षक.’’ मी अवाक होऊन ऐकत होतो – शिक्षक हे असे, काॅलेजला न जाता शिक्षक, फळा, पाटी दप्तर, वर्ग , कशाचाच ह्या पिढीला मोह नाही. घरातून, वातानुकुलित खोलीत हा असा अभ्यास त्यांना आवडत आहे. समोर ओरडायला शिक्षक नाही – शिस्त लावायला, वर्ग शाळा नाही, आवाजवी वाढलेल्या वजनाला दप्तराचे ओझे नाही, मेंदुला knowledge देत आहेत पण मनाला शिक्षकांचा ओलावा नाही – मागच्या पिढीची आठवण काढत झोपलेला मिलिंद या पिढीला बघत सकाळी उठला आणि झोपेतून खडबडून जागा झाला . काळ बदलला आहे आपण भाग्यषाली , आपल्याला असे जीव लावणारे, जीव ओतून शिकवणारे शिक्षक लाभले – 20,30, 40 वर्शांनंतर सुद्धा ज्यांच्या आठवणींनी डोळयाच्या कडा ओल्या होतात ते शिक्षक खरचं ‘‘Limited Edition’’ होते – त्यांना त्रिवार दंडवत – 9.50 चि लोकल आज चुकता कामा नाही – मिलिंद घाईतच घरातून बाहेर पडला, वळेची शिस्त शिक्षकांनीच लावली होती त्याला.

सौ. दिपाली चक्रदेव
बावा टॉवर , शिव , मुंबई- 22.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *