संवाद

रेवती कुलकर्णी 

 

प्रिय वाचकहो,

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष!!!!

बघता बघता गणेशोत्सवाची धामधूम संपली. नवरात्रीचा उत्सव संपला. 

आता दिवाळीपण अगदी दृष्टीपथात आहे. 

 

नवरात्रीनिमित्त आपल्या सभागृहात १ ॲाक्टोबर रोजी रोटरी क्लब मल्लेश्वरम आणि महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सशुल्क दांडिया आयोजित केला होता. त्यातून जमा झालेली रक्कम महिला सक्षमीकरण, मुलींचे आरोग्य आणि स्वच्छता ह्या सोशल कॅाजसाठी वापरण्यात येणार आहे. 

मंडळी, आम्ही परत परत तुम्हाला आवाहन करतो आहोत, मंडळात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण कृपया अगत्याने यावे. 

मंडळातले कार्यक्रम आपल्याच मनोरंजनासाठी सादर केले जातात. सादरकर्ते खूप मेहनतीने ते सादर करत असतात. आपल्या जास्तीतजास्त उपस्थितीने त्यांचा हुरूप वाढेल आणि आम्हालाही अजून वेगवेगळे कार्यक्रम आपल्यालासाठी सादर करण्याचा उत्साह वाढेल. तेंव्हा प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती!

“ पुस्तकपेटी आपल्या घरी” ह्या आमच्या योजनेलाही खूप छान प्रतिसाद लाभला आहे. आता ॲाक्टोबरपासून ह्या योजनेनुसार आपल्याला पुस्तके मिळायला सुरवात होईल. 

नोव्हेंबरमध्ये आपण “मी, स्वरा आणि ते दोघे” ह्या गाजलेल्या नाटकांचे बॅक टू बॅक दोन प्रयोग ५व ६ नोव्हेंबरला सादर करणार आहोत. एक रविंद्र कलाक्षेत्र येथे ५ ता. ला संध्याकाळी आणि ६ ता. ला न्यू होरायझन येथे सकाळी. 

दोन्ही प्रयोगाला रसिकांचा छान प्रतिसाद आहे. लवकरच दोन्ही प्रयोग हाऊसफुल्लच्या होण्याच्या दिशेने चालले आहेत. 

दिवाळीसाठी नेहमीप्रमीणे किल्ले स्पर्धा घेण्यात येणार आहे.

त्याचे सगळे तपशील ह्याच अंकात वाचायला मिळतील. 

 सनविविची “साहित्योन्मेष” ही स्पर्धाही आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. चुरस खूप वाढली आहे. 

शिवाय आपल्या सभासद लेखिका विद्याताई चिडले आणि सभासद लेखक राजेंद्र पडतुरे ह्या दोघांचे विशेष कौतुक आणि आभार.  ह्या दोघांनीही ह्या वर्षी सातत्याने आपले साहित्य सनविविसाठी दिले. 

अश्या सभासद लेखकांच्या लेखांचे नेहमीच स्वागत केले जाईल. 

    

   तर मंडळी निरोप घेते. आगामी कार्यक्रमांविषयी ह्या अंकातच वाचायला मिळेल. 

     असाच लोभ असावा ही विनंती!

  

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *