सनविवि आगामी कार्यक्रम,इ स न वि वि - एप्रिल २०२५ आगामी कार्यक्रम : प्रेरणा स्वतःपलीकडे जगण्याची

आगामी कार्यक्रम : प्रेरणा स्वतःपलीकडे जगण्याची

भारताच्या उत्तर टोकावरची सियाचीन ही जगातली सर्वोच्च युद्धभूमी आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील डोंगराळ बेचक्यातले हे अतिशय मोक्याचे ठिकाण आहे. भारतीय सैनिक अतिशय प्रतिकूल हवामानात तिथे आपल्या जीवावर उदार होऊन भारतीय सीमेचे रक्षण करत असतात. हवेत ॲाक्सिजनचे प्रमाण अत्यंत विरळ असल्याने साधा श्वास घेणेही सैनिकांसाठी मोठा संघर्ष असतो.

ही बाब हेरून पुण्याच्या सुमेधाताई चिथडे यांनी स्वतःला झोकून देऊन, सैनिकांसाठी, ॲाक्सिजन जनरेशन प्लॅंट उभारणीचे कार्य हाती घेतले. त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्या स्वतः सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या पत्नी व आई आहेत. भारतीय सैन्यदलाप्रती त्यांचे समर्पण वंदनीय आहे. त्यांचा कार्यप्रवास व अनुभव प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेण्याची आणि त्यांच्या ह्या अलौकिक कार्यास यथाशक्ती हातभार लावण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, हा संदेश शब्दशः जगणाऱ्या सुमेधाताई चिथडे  यांना ऐकायला नक्की या.

दि. २६ एप्रिल २०२५, सं. ६ वाजता, महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु, गांधीनगर सभागृह.

आणि

दि. २७ एप्रिल २०२५, स. ११.३० वाजता Bangalore International Centre, डोमलूर.

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *